about book
अॅन्डालुसिया इथल्या सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळाची ही कथा आहे. स्पेनमधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो. पिरॅमिड्सजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या सॅन्टिआगोला प्रवासात एक जिप्सी स्त्री, स्वतःला राजा म्हणवून घेणारा वयोवृद्ध आणि एक किमयागार भेटतो. प्रत्येक जण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो. तथापि, खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नसतं. वाटेत येणार्या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हेसुद्धा कोणाला सांगता येत नाही. भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सॅन्टिआगोला स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध लागतो. मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी अशी ही उत्कट आणि प्रेरक कथा आहे.
About author
प्रस्थापित धर्ममतांशी मुळीच सहमत नसलेल्या पाउलोंना सातत्याने नव्याचा ध्यास होता. 1973मध्ये पाउलो आणि रॉल या दोघांनी ‘अल्टरनेटिव्ह सोसायटी’मध्ये प्रवेश घेतला. वैयक्तिक विचार स्वातंत्र्याच्या हक्कासाठी काम करणारी ही संस्था होती. याच दरम्यान पाउलो यांचं अपहरण करण्यात आलं. पॅरामिलिटरीच्या गटाने त्यांचा छळवाद केला. या अनुभवामुळे पाउलो अंतर्बाह्य बदलले. वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांनी या जीवनपद्धतीचा निरोप घेण्याचा निश्चय केला. सामान्य जीवन जगण्याच्या दृष्टीने ते संगीतक्षेत्रात काम करू लागले. त्यांनी लिखाण करून पाहिलं. 1987मध्ये पाउलो यांनी द पिल्ग्रिमेज हे पुस्तक लिहिलं. सामान्य माणसाच्या जीवनात घडणार्या असामान्य गोष्टींची त्यांना आलेली अ नुभूती या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर एक वर्षाने पाउलो यांनी द अल्केमिस्ट हे सर्वस्वी वेगळं लिखाण केलं.