about book
राम म्हणजे सामाजिक मूल्यांची जोपासना करणारा मर्यादा पुरुषोत्तम! राम म्हणजे रघुवंशाचा वारस, सूर्यकुलातलं एक रत्न आणि विष्णूचा सातवा अवतार... अनेक स्त्रीवाद्यांनी त्याला झिडकारलं, तर राजकारण्यांनी त्याला प्रचारासाठी वापरलं; पण त्यामुळे त्यांचं वैभव आणि त्याची भव्यता या गोष्टी मात्र तसूभरही उणावल्या नाहीत. हिंदू धर्मियांनी ज्याची पूजा राजाच्या रूपात केली, असं एकमेव दैवत म्हणजे राम... तेव्हा देवदत्त पटनायक यांच्या प्रस्तुत पुस्तकांचं वाचन करा आणि 'आजही रामायण सुरूच आहे...' हे अनुभवा. अनेक पुराणकथांत दडलेला गूढ अर्थ देवदत्त यांनी या पुस्तकात अत्यंत रंजकतेनं मांडलाय.
About author
डॉ. देवदत्त पटनायक यांचे वैद्यकीय प्रशिक्षण झाले असून, ते व्यवसाने मार्केटिंग मॅनेजर आहेत, तसेच पौराणिक कथांचे उत्कट अभ्यासक आहेत. 'तुलनात्मक पुराणकथा' (comparative mythology ) या मुंबई विद्यापीठांतर्गत चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात त्यांनी सर्वोच्च गुण मिलवले असून, दैवी कथा, प्रतीके आणि विधी यांच्या आधुनिक काळातील संदर्भावर ते विस्ताराने व्याख्याने देतात. 'पेंग्विन इंडिया' यांच्यासोबत प्रकाशित झालेल्या त्यांच्या ग्रंथसंपदेत पुढील पुस्तके आहेत: द बुक ऑफ राम, मिथ = मिथ्या : अ हँडबुक ऑफ हिंदू मायथॉलॉजि, सीता आणि मुलांसाठी देवलोक कथामाला. देवदत्त यांची अपारंपरिक लेखनपद्धती आणि प्रासादिक, गुंतवून ठेवणारी शैली ही त्यांच्या व्याख्यानांमधून, पुस्तकांमधून आणि लेखांमधून सहज प्रतीत होते.