12 Rules for Life: An Antidote to Chaos ( Marathi)

12 Rules for Life: An Antidote to Chaos ( Marathi)

Author : Jordan B. Peterson (Author) Meena Sambhu Shete (Translator)

In stock
Rs. 599.00
Classification Psychology
Pub Date June 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 462
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431097
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

आपल्याला स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे नियमांची, मानांकनांची आणि मूल्यांची गरज असते. आपल्याला दिनक्रमाची आणि परंपरेची गरज असते. ही सुव्यवस्था, शिस्तबद्धता आहे. अव्यवस्था आपल्याला पूर्णपणे गिळंकृत करते आणि ही गोष्टही चांगली नसते. आपण सरळ आणि साध्या मार्गावरून वाटचाल करत राहण्याची गरज असते. या पुस्तकातील बारा नियमांपैकी प्रत्येक नियम आणि त्यांच्याशी संबंधित निबंध या मार्गावरच राहण्याविषयी मार्गदर्शन करतात. सुव्यवस्था आणि अव्यवस्था यांना विभागणारी रेषा म्हणजे हा मार्ग होय. तिथेच आपण पुरेशा प्रमाणात स्थिर असतो, पुरेशा प्रमाणात शोध घेत राहतो, पुरेशा प्रमाणात परिवर्तन घडवून आणतो आणि पुरेशा प्रमाणात सहकार्यही करतो. तिथेच त्या मार्गावरच आपल्याला आयुष्याचं आणि त्याच्या अटळ दुःखांचं समर्थन करणारा अर्थ सापडतो. आपण योग्य प्रकारे जगलो तर कदाचित आपल्या स्वतःच्या आत्मचैतन्याचं, आत्मभानाचं ओझं पेलण्यास आपण समर्थ बनू शकू.

About the Author(s)

जॉर्डन बी. पीटरसन यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांचे सल्लागार म्हणून काम केलं. निराशा, अतिस्वच्छता विकृती, चिंताग्रस्तता आणि छिन्नमनस्कता यांसारख्या आजारांवर उपचारासाठी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना त्यांनी या आजारांवर मात करण्यासाठी साहाय्य केलं. मॅप्स ऑफ मिनिंग ः द आर्किटेक्चर ऑफ बिलिफ या त्यांच्या पुस्तकानं धर्माच्या मानसशास्त्रात कायापालट घडवून आणण्याचं काम केलं. याआधी हार्वर्डमध्ये काम करत असताना लेव्हेन्सन टिचिंग प्राईझ या तेथील प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळालं होतं.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18457072
Code ProfilerTimeCntEmallocRealMem