1232 km: The Long Journey Home ( Marathi)

1232 km: The Long Journey Home ( Marathi)

Author : Vinod Kapri (Author) Rahul Mane (Translator)

In stock
Rs. 350.00
Classification Non Fiction
Pub Date December 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 204
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430052
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

कोव्हिड-19चा प्रसार रोखण्यासाठी सन 2020मध्ये लागू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे लाखो मजूर बेरोजगार, उपाशी आणि बेघर बनले. यामुळे असाहाय्य आणि आणि लाचार झालेल्या बहुतेकांनी मृत्यूला कवटाळणार्‍या प्रवासाला सुरुवात करत घरी परतण्यासाठीचा रस्ता धरला. अशाच रितेश, आशिष, रामबाबू, सोनू, कृष्णा, संदीप आणि मुकेश हे सर्व बिहारचे स्थलांतरित मजूर यांनीसुद्धा असा प्रवास सायकलवरून सुरू केला. त्यांचा वेदनादायक प्रवास उत्तर प्रदेशमधील गाझियाबादपासून सुरू झाला आणि त्यांच्या मातृभूमी असलेल्या बिहारमधील सहरसापर्यंत चालला. यादरम्यान पोलिसांच्या काठ्या आणि त्यांनी केलेले अपमान, उपासमार, थकवा आणि भीती यांच्याशी त्यांनी लढा दिला. या सर्वांचे दस्तऐवजीकरण या पुस्तकात लेखक विनोद कापरी यांनी केलं आहे. 1232 किमी ही अनंत संकटांत सापडलेल्या सात पुरुषांच्या असाधारण धैर्याची कहाणी आहे.

About the Author(s)

विनोद कापरी हे पुरस्कारप्राप्त फिल्मनिर्माता असून त्यांनाCan't Take This Shit Anymore (2014) या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या त्यांच्या पिहू (2017) या चित्रपटाला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपटनिर्मितीमध्ये येण्यापूर्वी त्यांनी विविध माध्यम संस्थांमधून 23 वर्षे पत्रकारिता केली आहे. या संस्थांमध्ये अमर उजाला, झी न्यूज, स्टार न्यूज, इंडिया टीव्ही आणि टीव्ही9चा समावेश आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18456368
Code ProfilerTimeCntEmallocRealMem