MODI: The Challenge of 2024 ( Marathi)

MODI: The Challenge of 2024 ( Marathi)

Author : Minhaz Merchant (Author) Savita Mhaskar (Translator)

In stock
Rs. 599.00
Classification NON-FICTION/ POLITICS
Pub Date 25th November 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 388
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355439802
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

2024ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरू शकते. जर नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ सलग तिसर्‍यांदा मिळवण्यात यशस्वी झाले, तर जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी येणारे ते पहिलेच नेते असतील. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंतच्या या समग्र आणि व्यापक आढाव्यात मिन्हाज मर्चंट यांनी, मोदींनी पंतप्रधानपदी असताना भारतीय राजकारण, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीला कसा आकार दिला, याचं मार्मिक विश्लेषण केलं आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी केलेल्या एकजुटीची रणनीती भाजपाचा विजयरथ रोखू शकेल का, याची चाचपणीदेखील या पुस्तकात करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षांचं शासन असलेल्या राज्यांचे धुरंधर राज्यकर्ते आपापसातील मतभेद बाजूला सारू शकतील? 2012पासून मिन्हाज मर्चंट मोदींना अनेकदा भेटले, त्यांची मुलाखत घेतली. लेखकाने मोदींच्या भौगोलिक राजकारण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा आदि मुख्य विषयांसंदर्भातील धोरणांचं विश्लेषण केलं आहे. 10 विस्तृत विभाग आणि 31 प्रकरणं असलेल्या या पुस्तकात मोदींच्या मागील दशकातील एका प्रादेशिक नेत्यापासून वैश्विक राजनेता बनण्यापर्यंतचा प्रवास साकारण्यात आला आहे.

About the Author(s)

मिन्हाज मर्चंट - माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि ज्येष्ठ उद्योगपती आदित्य बिर्ला यांचे चरित्रकार. त्यांनी स्टर्लिंग न्यूजपेपर्स प्रा. लि. या अग्रणी माध्यम कंपनीची स्थापना केली, जिला कालांतराने इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाने अधिग्रहित केलं. भारतातील विशेष मॅगझिन्सचे प्रणेते असलेल्या मिन्हाज मर्चंट यांनी 10पेक्षा अधिक मॅगझिन्सची रुजवात केली. आपल्या दुसर्‍या मीडिया स्टार्टअपमध्ये त्यांनी अमेरिकेतील मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसाठी (सीईओ) इनोवेट नावाच्या तंत्रज्ञानविषयक मॅगझिनचं संपादन आणि प्रकाशन केलं. उल्लेखनीय बाब म्हणजे जागतिक स्तरावर मान्यता आणि प्रशंसापात्र या मासिकाचं लेखन, संपादन आणि मुद्रण भारतातच करण्यात येत असे आणि त्यानंतर कंपनीच्या अमेरिकी सहयोगींद्वारा, अमेरिकेच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींकडे ते वितरित करण्यासाठी पाठवलं जात असे. वृत्तपत्र जगतातील अतिशय लोकप्रिय स्तंभलेखक आणि दूरदर्शन समालोचक असलेले मर्चंट हे भौतिकशास्त्र विषयासाठी असलेल्या लेडी जीजीभाई शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18431880
Code ProfilerTimeCntEmallocRealMem