Being Love: Creating Beautiful Relationships(Marathi )

Being Love: Creating Beautiful Relationships(Marathi )

Author : Sister Shivani with Suresh Oberoi (Author) Chinmaya Sumant-Kulkarni (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Spirituality
Pub Date June 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 350
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355432537
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

‘प्रेम बाहेर कुठेही नसून, ते आपल्या आतच आहे,' हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. प्रस्तुत पुस्तकात आपण प्रेमाच्या नावाखाली ज्या भावनांचा वापर करतो - मोह, अपेक्षा, भीती, चिंता, तणाव व क्रोध - त्यांचं विश्लेषण केलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनातून किंवा अपेक्षांमधून मुक्त होऊन लोकांबद्दल योग्य विचार करता, लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करता; तेव्हा तुम्ही ‘नि:स्वार्थ प्रेमाचे प्रसारक' बनता. हे पुस्तक आपल्याला योग्य विचार करायला, स्वत:वर प्रेम करायला, ते अनुभवायला आणि दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवायला मार्गदर्शन करतं.

About the Author(s)

ब्रह्माकुमारी शिवानी सन 1996पासून ब्रह्माकुमारी प्रणीत राजयोगाची साधना करत आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात तर्काधिष्ठित आणि सुलभ मार्गाने आध्यात्मिक तत्त्वांचं आचरण करून ती कशा प्रकारे आत्मसात करावीत, याचं मार्गदर्शन त्या करतात. संपूर्ण जगामध्ये प्रवास करत असताना त्या अध्यात्म, स्व-सशक्तीकरण, भावनिक सौख्य, आनंद, नातेसंबंध आणि नेतृत्व या विषयांवरील त्यांच्या ज्ञानाचा खजिना जणू मुक्त हस्ताने वाटत असतात. मानवी वर्तनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवण्याच्या त्यांच्या कार्यासाठी मार्च 2019मध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सुरेश ओबेरॉय हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी आजवर 250हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये काम केले आहे. सन 1982मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते आध्यात्मिक जीवनशैलीचे खंदे पुरस्कर्ते असून, विविध व्यासपीठांवरून ते याचा प्रसार करत असतात. वर्ल्ड सायकिॲट्रिक असोसिएशनने त्यांची ‘सदिच्छा राजदूत' म्हणून नियुक्ती केली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18426264
Code ProfilerTimeCntEmallocRealMem