Designing Destiny: The Heartfulness Way (Marathi)

Designing Destiny: The Heartfulness Way (Marathi)

Author : Kamlesh D. Patel

In stock
Rs. 399.00
Classification Self-Help/Spirituality
Pub Date 25th March 2024
Imprint Manjul Publishing House
Page Extent 208
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355434128
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या नावीन्यपूर्ण पुस्तकात दाजी अशा प्रश्नांना साधी व व्यावहारिक सुज्ञपणा असलेली उत्तरे देतात. द हार्टफुलनेस वे या पुस्तकानंतर ते आपल्याला प्रवासाच्या पुढील टप्प्यावर घेऊन जातात, ज्यात आपल्या जीवनशैलीत विशुद्धता आणून आपल्या इहलोकातील आणि त्याबरोबरच परलोकातील प्रारब्धाची रचना करण्यासाठी हार्टफुलनेस साधनेचा वापर कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन करतात. चेतना आणि उत्क्रांतीची भूमिका या विषयांचे सविस्तर वर्णन करून आपल्या जन्म व मृत्युसमयी काय होते आणि आपले जीवन बदलून टाकणार्‍या त्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये कसे वागायचे हे समजावतात. सोप्या भाषेतील आणि आंतरिक ज्ञानाने परिपूर्ण असे, हे पुस्तक तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देईल व कोणत्याही आव्हानाचा सामना करून, त्यातून मार्ग काढून, अतिशय कठीण परिस्थितीकडेही विकासाची संधी म्हणून पाहण्यास शिकवेल.

About the Author(s)

दाजी म्हणून सर्वदूर परिचित असलेले श्री कमलेश पटेल प्राचीन परंपरेचा मौलिक आवाज आहेत. त्यांची शिकवण ही हार्टफुलनेसच्या मार्गावर चालताना त्यांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहे, ज्यातून त्यांची सखोल चौकस वृत्ती आणि जगभरातील महान आध्यात्मिक परंपरा व वैज्ञानिक प्रगतीबद्दलचा आदर दिसून येतो. स्वत:ला आध्यात्मिकतेचा विद्यार्थी म्हणवून घेत, ते त्यांचा बहुतांश वेळ आणि शक्ती चेतनेच्या आणि आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात संशोधन करण्यात व्यतीत करतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18440776
Code ProfilerTimeCntEmallocRealMem