About the Book
या पुस्तकामधून, भारतीय बचतकर्त्यांना गुंतवणूकदारांसाठी सातत्यानं प्रचंड परताव्यांची निर्मिती करत राहणार्या स्वच्छ, सुव्यवस्थापित भारतीय कंपन्यांना ओळखण्याचं साधं पण प्रभावी गुंतवणूक तंत्र सांगण्यात आलं आहे. हे पुस्तक ‘मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स’मधील पारितोषिक विजेत्या टीमकडून करण्यात आलेल्या सखोल संशोधनावर आधारित आहे. तीन ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या भारतीय शेअर बाजाराविषयी शिकण्यास वाचकांना मदत व्हावी, यासाठी या पुस्तकात नमुना उदाहरणांच्या अभ्यासांचा (केस स्टडीजचा) आणि तक्त्यांचा वापर करण्यात आला आहे. चुकीच्या मार्गदर्शनामुळे भारतीय चौकटीत अप्रस्तुत ठरणार्या पाश्चात्त्य गुंतवणूक सिद्धान्तांविषयीच्या अनेक कल्पनांचाही ते दंभस्फोट करतं.
About the Author(s)
सौरभ मुखर्जी हे रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचे फेलो असून, गुंतवणूक, उद्योगनीती (बिझनेस स्ट्रॅटेजी) आणि स्व-सुधारणा (सेल्फ इंप्रूव्हमेंट) अशा विषयांवरील त्यांनी लिहिलेली चार पुस्तकं खूपच गाजलेली आहेत. ‘मार्सेलस’मध्ये जाण्यापूर्वी ते अंबित कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते आणि त्या आधी क्लिअर कॅपिटल (यूके) या कंपनीचे सहसंस्थापक होते.
रक्षित रंजन हे मार्सेलस कंपनीच्या कन्सिस्टंट कंपाउंडर्स फंड या फ्लॅगशीप फंडाचे व्यवस्थापन करतात. भारत आणि इंग्लंड येथे इक्विटी व्यवस्थापनाचा त्यांना 16 वर्षांहून अधिक अनुभव असून, या पुस्तकाचे सहलेखन त्यांनी सौरभ यांचेसोबत केले आहे.
सलिल देसाई हे चार्टर्ड अकाउंटन्ट आहेत. भारतीय इक्विटी बाजारांमधील विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी सोळाहून अधिक वर्षं काम केलं आहे. मार्सेलसमधील काही मोठ्या सल्ला विभागांचं ते व्यवस्थापन करतात.