Bujgavane

Bujgavane

Author : Kanishka Hivarekar

In stock
Rs. 175
Classification Fiction
Pub Date April 2021
Imprint Ekatra - a joint imprint of Manjul & Pratilipi
Page Extent 130
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924394
In stock
Rs. 175
(inclusive all taxes)
OR
About the Book

ही एक उत्कंठावर्धक भयकथा आहे. गढदुर्गमधले चकख रिसोर्ट म्हणजे साक्षात मृत्यूचा तांडवच... हे रिसोर्ट दगड-विटांनी न बनता माणसांच्या मांस आणि रक्ताच्या चिखलानं बनलेलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नाही. हे रिसोर्ट म्हणजे महाकाळ नावाच्या सैतानाचं साम्राज्य आहे... ज्याचा वास आहे एका बुजगावण्यात... जो आजही माणसाच्या प्राणांचा भुकेला आहे. अशा काळ बनून उभ्या असलेल्या रिसोर्टमध्ये सात-आठ तरुणांचा एक ग्रुप सहलीसाठी म्हणून येतो आणि बारा वर्षं बंद पडलेलं ते लंबक घड्याळ अचानक सुरू होतं. मांस आणि रक्त यासाठी भुकेलं असेललं ते सैतानरूपी बुजगावणं एक-एक करून आपला सावज हेरून शिकार करू लागतं. मग सुरू होतो मृत्यूचा खेळ... यात विजय कुणाचा होतो? ही तरुणाई सैतानाचा सामना कशा प्रकारे करते? मृत्यूचा तांडव असाच सुरू राहतो की बुजगावणरूपी सैतानाचा अंत होतो? हे जाणूण घेताना वाचक निश्चितच एका जागी खिळून राहतो.

About the Author(s)

कनिष्क हिवरेकर हे कोडिंग आणि डिझाइनिंग या क्षेत्रातील संगणक अभियंते आहेत. केवळ आवडीपोटी ते लेखन क्षेत्रात सक्रिय आहेत. लहानपणापासून त्यांनी रहस्यकथा, थरारकथा अशा वैविध्यपूर्ण साहित्याचं वाचन केलं असून, अनेक थरारक चित्रपट पाहण्याचा त्यांना बालपणापासूनच छंद आहे. याच छंदाच्या प्रेरणेतून ते वाचकांना खिळवून ठेवणार्‍या कथा लिहीत आहेत.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15485808
Code ProfilerTimeCntEmallocRealMem