About the Book
पेपाल, टेस्ला मोटर्स, स्पेसएक्स आणि सोलरसिटी या कंपन्यांची स्थापना करणारा अवलिया माणूस म्हणजे इलॉन मस्क! या सार्याच कंपन्यांनी व्यवसाय व उद्योगक्षेत्र यांमध्ये एक नवी लाट निर्माण केलेली आहे. सतत धोके पत्करणारा इलॉन अपयशांना घाबरून मागे हटत नाही. तो मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत धडपडत असतो. हे पुस्तक म्हणजे इलॉन मस्कने मानवजातीचा प्रवास मंगळाच्या दिशेने न्यावा का, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणारा हा
मूलभूत लेखाजोखा आहे. इलॉन मस्कच्या आयुष्याची गाथा आणि त्याची विजिगीषू वृत्ती यांचे यथार्थ चित्रण हे पुस्तक करते.