About the Book
सुखी, समाधानी जीवन यथार्थपणे जगण्यासाठी एकतीस अशा प्रोत्साहन व उत्तेजन देणाऱ्या विचारधारा या पुस्तकात नमूद केलेल्या आहेत. यात पूज्य दादाजींनी अत्युत्तम असे विचार मांडले आहेत, त्यामुळे आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणून सोनेरी दिवस कसे निवडू शकतो, या संदर्भात विवेचन केलेले आहे. यासाठी केवळ पिता-परमेश्वरावर दृढ विश्वास बाळगत, सुखी-समाधानी जीवन प्राप्तीसाठी नेहमी सकारात्मक मानसिकता व विचारसरणी बाळगा. आपण सोसत असलेल्या यातना, रोगराई, यश, अपयश, गरिबी-श्रीमंती या सर्व गोष्टी पूर्वजन्माच्या प्रेषित असून, फलस्वरूपी या जन्मी मिळत असतात. तथापि, आपण आपले जीवन, प्रारब्ध निश्चितपणे बदलू शकतो. जर आपल्याला योग्य मार्ग व योग्य कृतीची जाण असेल तरच. या पुस्तकात पूज्य दादाजींनी याबद्दलचे आपले विचार परखडपणे मांडलेले आहेत.