The Courage to be Disliked ( Marathi)

The Courage to be Disliked ( Marathi)

Author : Ichiro Kishimi and Fumitake Koga (Author) Sudarshan Aathwale (Translator)

In stock
Rs. 450.00
Classification Non Fiction/self help/Happines
Pub Date Dec 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 306
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355432025
In stock
Rs. 450.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात अल्फ्रेड ॲडलरच्या सिद्धान्तांचा वापर केला आहे. त्या आधारे एक तत्त्वज्ञ आणि एक तरुण यांच्यातील ज्ञानवर्धक संभाषण यात मांडलं आहे. फ्रॉईड आणि युंग यांच्याप्रमाणेच अॅडलर हे मानसशास्त्राच्या जगातील महान व्यक्तींपैकी एक होते. या पुस्तकात, तत्त्वज्ञ आपल्या शिष्याला सांगतो की, आपण सर्व जण भूतकाळातील अनुभव, शंका आणि इतर लोकांच्या अपेक्षांचं बंधन यांतून कशा प्रकारे मुक्त होऊन आपलं जीवन जगू शकतो. ही विचारसरणी मुक्त करणारी आहे, त्यामुळे आपण स्वतःला बदलण्याचे साहस विकसित करू शकतो, तसंच आपण स्वतः आखून घेतलेल्या किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांनी आपल्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादांकडे दुर्लक्ष करू शकतो.

परिणामी, आपल्यासमोर एक असं पुस्तक आहे, जे अत्यंत सोपं असून अतिशय महत्त्वाचंही आहे. हे पुस्तक लाखो लोकांनी वाचलंय आणि त्याचा लाभही घेतला आहे. आता हे तुमच्या भाषेत उपलब्ध आहे, तेव्हा तुम्हीही याचा अवश्य लाभ घ्या.

About the Author(s)

ईचिरो किशिमी यांचा जन्म १९५६ मध्ये क्योटो येथे झाला आणि सध्या ते तिथेच राहतात. शालेय दिवसांपासूनच त्यांना तत्त्वज्ञानी बनण्याची इच्छा होती. १९८९ पासून ते ॲडलरच्या मानसशास्त्रावर संशोधन आणि लेखन करत आहेत, तसंच त्यासंबंधी ते व्याख्यानंही देत आहेत. ते जपानी सोसायटी ऑफ अॅडलेरियन सायकॉलॉजीचे प्रमाणित समुपदेशक आणि सल्लागार आहेत. त्याच आधारे, ते मानसशास्त्रीय दवाखान्यांत तरुणांना सल्ला देण्याचं कामही करत आहेत. त्यांनी अल्फ्रेड ॲडलरच्या निवडक रचनांचे जपानी भाषेत अनुवाद केले आहेत. त्याचबरोबर इतर अनेक पुस्तकांसह अडोरा शिनरिगाकु न्यूमॉन (ॲडलेरियन मनोविज्ञानाची ओळख) देखील लिहिलं आहे.

फुमिटाके कोगा यांचा जन्म १९७३ मध्ये झाला. ते एक व्यावसायिक लेखक आहेत आणि त्यांच्या रचनांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी व्यावसायिक पुस्तकं आणि ललितेतर साहित्य लिहिलं आहे. त्यांच्या वयाच्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांनी ॲडलेरियन मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि परंपरागत समजेला आव्हान देणाऱ्या त्याच्या स्वरूपामुळे ते खूप प्रभावित झाले. यामुळेच ईचिरो किशिमी यांना भेटण्यासाठी ते अनेकदा क्योटोला गेले आणि अॅडलेरियन मानसशास्त्राचे सार समजून घेऊन त्यांनी 'संवाद स्वरूपा' साठी नोट्स घेतल्या. ग्रीक तत्त्वज्ञानाची ही पद्धत या पुस्तकात वापरली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18446736
Code ProfilerTimeCntEmallocRealMem