I Came Upon a Lighthouse: A Short Memoir of Life with Ratan Tata

I Came Upon a Lighthouse: A Short Memoir of Life with Ratan Tata

Author : Shantanu Naidu (Author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (Translator)

In stock
Rs. 399.00
Classification Memoir
Pub Date January 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 250
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789391242947
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

शंतनू नायडू हा विशीतला तरुण, 2014 साली, ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करू लागला. वेगाने धावणार्‍या गाड्यांच्या चाकांखाली चिरडल्या जाणार्‍या स्थानिक भटक्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्याने एक अभिनव योजना शोधून काढली. स्वतः रतन टाटांना भटक्या कुत्र्यांबद्दल अतोनात कणव असल्याने त्यांनी शंतनूच्या कृत्याची दखल घेतली. त्याने प्रभावित होऊन त्यांनी शंतनूच्या या व्यवसायात पैसे तर गुंतवलेच; पण कालांतराने ते शंतनूचे गुरू, बॉस आणि अनपेक्षितपणे प्रिय मित्रसुद्धा झाले. ‘रतन टाटा एक दीपस्तंभ’ ही एक अतिशय प्रामाणिक आणि मनःपूर्वक सांगितलेली भावकथा आहे. एकविसाव्या शतकातला तरुण आणि ऐंशीच्या दशकातला तपस्वी यांच्यातल्या अनोख्या नात्याची चुणूक आपल्यासमोर येते आणि त्यातूनच भारताचा लाडका मेरूमणी आपल्यासमोर वेगळ्याच प्रकाशात झळकतो.

About the Author(s)

इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना सामाजिक कारणांकरता वेगवेगळे म्युझिक व्हिडिओे निर्माण करण्याचा छंद शंतनू नायडूला होता. त्यातूनच, ‘पॉज् फॉर अ कॉज्’ या नावाचा व्हिडिओ त्याने प्राण्यांच्या हितासाठी काढला. त्यायोगे, तो स्वतःला त्या क्षेत्रात प्रस्थापित करू पाहत होता. ती त्याची सुरुवात होती. ऑटोमोटिव्ह डिझाईन इंजिनिअर म्हणून टाटा एल्क्सी इथे काम करत असताना त्याने ‘मोटोपॉज्’ नावाचा स्टार्टअप कार्यक्रम सुरू केला. त्या माध्यमातून, भारतातल्या भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्ट होणार्‍या कॉलर्स घालण्याचं काम त्याने केलं, त्यामुळे रात्री रस्त्यांवर कुत्र्यांना होणार्‍या अपघाताचं प्रमाण कमी व्हायला मदत झाली. त्याच्या या उद्यमशीलतेमध्ये श्री. रतन टाटा यांनी प्रामुख्याने गुंतवणूक केली.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18461704
Code ProfilerTimeCntEmallocRealMem