Kiss That Frog  ( Marathi)

Kiss That Frog ( Marathi)

Author : Brian Tracy and Christina Tracy Stein (Author) Indrayani Chavhan (Translator)

In stock
Rs. 250.00
Classification Self Help
Pub Date 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 158
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355435217
In stock
Rs. 250.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात सांगितलेली प्रभावी तंत्रं आणि करायला सांगितलेला सराव यांमुळे तुमची मानसिकता पूर्णपणे बदलून जाईल. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक अनुभवामध्ये तुम्हाला काही चांगलं शिकण्याजोगं सापडेल; मग भले सुरुवातीला त्या व्यक्तीशी वागणं किंवा तो अनुभव घेणं तुम्हाला खूप कठीण किंवा आव्हानात्मक वाटलेलं असेल. अढळ आत्मविश्वास कसा मिळवायचा, स्वत:ला सर्वश्रेष्ठ कसं घडवायचं आणि असामान्य जीवन कसं जगायचं हे या पुस्तकातून तुम्ही शिकू शकाल.

About the Author(s)

ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ता, प्रशिक्षक, परिसंवाद संचालक आणि समन्वयक आहेत. कॅलिफोर्नियामधील सोलाना बीच इथे स्थित ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल, या प्रशिक्षण-समुपदेशन संस्थेचे ते संचालक आहेत. 1981मध्ये देशभरात त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून आणि परिसंवादांमधून यशस्वितेसाठी आवश्यक तत्त्वांचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. आज त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, श्राव्य आणि दृकश्राव्य कार्यक्रमांचे अडतीस भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत आणि अठ्ठावन्न देशांमध्ये त्यांच्या व्यावसायिक तत्त्वांचा उपयोग केला जात आहे.

क्रिस्टीना यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया इथून कला शाखेत शिक्षण घेऊन मानसशास्त्रामध्ये पदवी मिळवली आहे आणि एँटीऑक युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीय मानसशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे. कॅलिफोर्निया बोर्ड ऑफ बिहेव्हिअरल सायन्सेस या संस्थेतर्फे वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या उपचारक म्हणून त्यांनी सनद प्राप्त केली आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली थेरपी तसंच कॅलिफोर्निया असोसिएशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली थेरपी या दोन्ही संस्थांच्या मानद सदस्य असलेल्या क्रिस्टीना ट्रेसी या एक प्रमाणित न्यूट्रिशिअन अँड लाइफस्टाइल कोच म्हणूनही कार्यरत आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18426368
Code ProfilerTimeCntEmallocRealMem