Mandarya ( Marathi)

Mandarya ( Marathi)

Author : Rajendra Kher

In stock
Rs. 599.00
Classification Fiction/Epic
Pub Date 4th November 2018
Imprint Manjul Publishing House
Page Extent 402
Binding Perfect Paperback
Language Marathi
ISBN 9789388241250
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

ऋषीय कार्याची अतुलनीय, अलौकिक, खडतर परंपरा तितक्याच सामर्थ्याने पेलणारे मांदार्य अर्थात अगस्त्य ऋषी... ऋषी परंपरेची धुरा समर्थपणे वाहताना मांदार्यांनी समाज-उत्थान, आश्रमीय जीवनपद्धतीची आखणी, स्व-सामर्थ्याच्या आधारे राक्षसांचा निःपात अशी लक्षणीय कार्यं केली. त्याचबरोबर राम-रावण युद्धात आवश्यक अशी ‘ऋषीय-भूमिका’देखील निभावली. त्यांनी तमीळ भाषेला पुनरुज्जीवित केलं. दिव्य अशा ‘नाडीग्रंथा’ची निर्मिती केली... अगस्त्य ऋषींचा हा जीवनपट वाचता-वाचता वाचकांना त्यांच्या विराट रूपाची कल्पना येत जाते. मांदार्यांनी क्वचितप्रसंगी ‘शस्त्र’ही हाती धरलं ; पण त्यांचा संपूर्ण भर होता तो ‘विचार-शस्त्रावर’! अगस्त्य ऋषींचे विचार-शस्त्र हे आजच्या काळातही प्रत्येकानं अनुसरावं आणि त्याआधारे स्व-कल्याण साधावं असंच आहे...

About the Author(s)

‘देह झाला चंदनाचा’, ‘दिग्विजय’, ‘गीतांबरी’, ‘धनंजय’, ‘देवांच्या राज्यात’, ‘बिंदूसरोवर’ अशा विषयवैविध्यांनी युक्त कादंबऱ्यांचे रसिकमान्य लेखक राजेन्द्र खेर! त्यांनी 1989पासून लेखनाला प्रारंभ केला. विषयाचा सखोल अभ्यास, चित्रमय शैली, उत्कंठवर्धकता तसंच रंजकता ही त्यांच्या लेखनाची काही ठळक वैशिष्ट्यं आहेत. ‘स्वाध्याय प्रणेते’ पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या अलौकिक जीवनावरील ‘देह झाला चंदनाचा’ या राजेन्द्र खेर लिखित कादंबरीचा आतापर्यंत गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून अनुवाद झाला आहे. शिवाय त्यांच्या अन्य पुस्तकांचेही इंग्रजी अनुवाद प्रकाशित आहेत. राजेन्द्र खेर यांची जवळपास सर्व पुस्तकं ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455264
Code ProfilerTimeCntEmallocRealMem