Calling Sehmat ( Marathi)

Calling Sehmat ( Marathi)

Author : Harinder Sikka

In stock
Rs. 225.00
Classification Fiction
Pub Date 25 October 2018
Imprint Manjul- Penguin Co-Pub
Page Extent 233
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9780143446231
In stock
Rs. 225.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

सेहमत... एक महाविद्यालयीन काश्मिरी युवती! तिच्या मरणासन्न वडिलांची अंतिम इच्छा समजली, त्या वेळी त्यांच्या उत्कट इच्छेला आणि देशभक्तीला शरण जाण्याखेरीज ती फारसं काहीच करू शकत नव्हती. त्यांच्या चांगल्या परिचयातील पाकिस्तानी जनरलच्या मुलाबरोबर तिनं लग्न केलं. भारतीय गुप्तचर यंत्रणेला नियमितपणे माहिती कळवत राहणं, ही तिची मोहीम होती. तिच्या प्रिय देशाचं नौदल नष्ट करू शकणारी गोपनीय माहिती तिच्या हाती लागेपर्यंत तिनं हे काम कमालीच्या धैर्यानं आणि धाडसानं पार पाडलं.

खऱ्याखुऱ्या घटनांनी प्रेरित असलेली कॉलिंग सेहमत ही हेरगिरीवर आधारित रोमांचक रहस्यकथा आहे. जी प्रसिद्धीच्या झोतात कधीच आली नाही, अशा एका अनामिक नायिकेची ही अजरामर कहाणी आहे.

About the Author(s)

हरिंदर सिक्का हे सध्या पिरॅमल ग्रुप या प्रसिद्ध व्यवसायाचे गट संचालक आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी भारतीय नौदलात प्रवेश केला. जानेवारी 1981मध्ये ते राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्त झाले आणि 1993मध्ये लेफ्टनंट कमांडर म्हणून त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारली.

कॉलिंग सेहमत हे त्यांचं पहिलंच पुस्तक आहे. या पुस्तकावरूनच मेघना गुलझार यांनी राझी या चित्रपटाची निर्मिती केली आणि तो मे 2018मध्ये प्रदर्शित झाला.

आपल्या कुटुंबीयांसह सिक्का नवी दिल्लीत राहतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18461784
Code ProfilerTimeCntEmallocRealMem