Devil's Advocate: The Untold Story

Devil's Advocate: The Untold Story

Author : Karan Thapar

In stock
Rs. 350.00
Classification
Pub Date February 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 222 + 16 Photo Pages
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789388241533
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

डेव्हिल्स अॅडव्होकेट
परखड पत्रकाराच्या आयुष्याचा रंजक रिपोर्ताज

या पुस्तकामध्ये करण यांनी त्यांचं बालपण, डून स्कूलमधील शालेय जीवन, नेहरू-गांधी घराण्याशी असलेली जवळीक आणि तारुण्यामध्ये फुललेली प्रेमकथा अशा अनेक व्यक्तिगत आठवणी शब्दांकित केल्या आहेत. न्यूज चॅनेलवर होणार्या मुलाखतींच्या कार्यक्रमांमुळे करण थापर मुख्यत: ओळखले जातात. पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, जयललिता, परवेज मुशर्रफ, बराक ओबामा, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदी ही त्या मुलाखतींची काही प्रातिनिधिक उदाहरणं. करण यांच्या गाजलेल्या मुलाखती, त्या वेळी पडद्यामागे घडलेल्या अनपेक्षित घटना हा या पुस्तकातील महत्त्वाचा भाग आहे.
एका पत्रकारानं त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांचा, सुख-दु:खाच्या क्षणांचा रिपोर्ताज वाचकांसमोर सादर केला आहे. तो वाचताना आपण त्याच्याशी समरस होतो. त्यामध्ये रमून जातो.

About the Author(s)

करण थापर हे इंग्लंडमधील लंडन वीकेंड टेलिव्हिजन या दूरचित्रवाणी वाहिनीमध्ये दहा वर्षं कार्यरत होते. वीकेंड वर्ल्ड, द वर्ल्ड धीस वीक, द बिझनेस प्रोग्रॅम, द वाल्डेन इंटरव्ह्यू हे त्यांचे काही प्रसिद्ध कार्यक्रम. १९९१मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी आयविटनेस (चलचित्र आणि दूरदर्शन), हार्डटॉक इंडिया (बीबीसी), डेव्हिल्स अॅडव्होकेट (सीएनएन-आयबीएन) आणि टू द पॉइंट (इंडिया टुडे) यांसारख्या अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. सध्या ते इन्फोटेन्मेंट टेलिव्हिजन (आयटीव्ही)चे अध्यक्ष आहेत. ते हिंदुस्तान टाइम्समध्ये ‘संडे सेंटिमेंट्स’ हे साप्ताहिक सदर आणि बिझनेस स्टँडर्डमध्ये ‘अॅज आय सी इट’ हे पाक्षिक सदर लिहितात. करण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18464416
Code ProfilerTimeCntEmallocRealMem