Mrityucha Sohala ( Marathi)

Mrityucha Sohala ( Marathi)

Author : Rajendra Kher

In stock
Rs. 299.00
Classification Non-Fiction
Pub Date June 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 210
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389143010
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकातून वाचकांचा ‘मृत्यू’कडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळातूनच बदलेल. मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी आपली दृष्टी व्यापक होईल. कारण, मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय घडतं; मृत्यूनंतरचं जीवन कसं असतं; आपले नातेवाईक, स्वकीय, मित्र-मैत्रिणी आपल्याला त्यांच्या मृत्यूनंतर भेटतात का; कसे भेटतात; भूत, पिशाच्च, स्वर्ग-नरक यांचे स्तर कसे आहेत; पुनर्जन्म म्हणजे काय; कर्मं, कर्म-बंधनं, कर्मांच्या बंधनातून सुटून मोक्षाच्या दिशेने प्रवास या गोष्टी सर्वसामान्यांना शक्य असतात का; भिन्न विश्व आणि भिन्न मिती यांसह परलोकाचं स्वरूप कसं आहे, याची माहिती आपल्याला या पुस्तकातून होणार आहे. जगातील सर्व विचार, अभ्यासपद्धती, धर्मविचार तसेच विज्ञानाचा संदर्भ यांच्या आधारे मृत्यू आणि परलोक या विषयाची उकल लेखक राजेन्द्र खेर यांनी तर्कशुद्ध पद्धतीने केलेली आहे.

About the Author(s)

संबंधित विषयाचा सखोल अभ्यास, चित्रमय शैली, उत्कंठावर्धकता तसंच रंजकता ही राजेन्द्र खेर यांच्या लेखनाची काही ठळक वैशिष्ट्यं. ‘देह झाला चंदनाचा’, ‘गीतांबरी’, ‘धनंजय’ तसंच अगस्त्य ऋषींच्या अलौकिक जीवनावर आधारित मराठी वाङ्मयविश्वातील पहिली कादंबरी ‘मांदार्य’ यांसारखी त्यांची सर्व पुस्तकं जवळपास ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत. राजेन्द्र खेर यांना आतापर्यंत ‘पुणे मराठी ग्रंथालयाचा ना. ह. आपटे पुरस्कार’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार’ असे विविध पुरस्कार लाभले आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18461888
Code ProfilerTimeCntEmallocRealMem