Open: An Autobiography (Marathi)

Open: An Autobiography (Marathi)

Author : Andre Agassi

In stock
Rs. 499
Classification Autobiography
Pub Date August 2020
Imprint Manjul
Page Extent 600
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-93-89647-90-7
In stock
Rs. 499
(inclusive all taxes)
OR
About the Book

आंद्रे आगासी - इतिहासातील अत्यंत लोकप्रिय क्रीडापटूंपैकी एक, टेनिस कोर्टावर पाऊल ठेवणार्याा गुणवान खेळाडूंपैकी एक. टेनिसमधील कौशल्यासाठी आणि यशासाठी ज्याचा मनस्वी हेवा करावा, असा हा आंद्रे आगासी त्याच्या लहानपणी याच टेनिसचा विलक्षण तिरस्कार करीत होता! पाळण्यातही त्याला खेळायला टेनिसची रॅकेटच दिली जात होती. प्राथमिक शाळेत असतानाच रोज शंभर चेंडू रॅकेटने मारण्याची सक्ती केली जात होती. एका बाजूला ‘लहान वयात मोठी कामगिरी करणारा असामान्य मुलगा,’ अशी ख्याती मिळवीत असताना दुसर्या बाजूला त्याच्या मनावर प्रचंड दबाव येत होता. त्याच्या मनात सतत चालणार्यास या संघर्षाने आंद्रे आगासीची शेवटपर्यंत सोबत केली. वाचकाला झपाटून टाकणार्यास या सुंदर आत्मकथेतही त्याने नुकसान करणारी अपूर्णता आणि तारक ठरणारी परिपूर्णता यांमधील त्याचा संघर्षच शब्दबद्ध केला आहे. प्रांजलपणा, मनमोकळा स्पष्टवक्तेपणा आणि टेनिसच्या खेळातल्या सारखीच वेगवान उत्सुकतावर्धक गती अशा टेनिसपटूची ही जीवनकहाणी वाचकाला नक्कीच चविष्ट वाटेल.

About the Author(s)

आंद्रे आगासी याची व्यावसायिक खेळातील कारकीर्द1986 ते2006या वीस वर्षांची. या काळात त्याने ‘प्रथम स्थान’ कधीच सोडले नाही. त्याने एकेरीच्या सामन्यांमध्ये आठ ग्रॅन्ड स्लॅम चॅम्पियनशिप्स मिळवल्या. खेळाडूंच्या ‘ऑल टाइम’ यादीत त्याने कायमच सातवे स्थान धरून ठेवले होते. ऑलिम्पिक्स स्पर्धेत सुवर्णपदक आणि चारही ग्रॅन्ड स्लॅम सिंगल्स चॅम्पियनशिप्स यांच्या बळावर खेळातील कारकिर्दीसाठी ‘गोल्डन स्लॅम’ मिळवणारा तो एकमेव पुरुष खेळाडू आहे. त्याने ‘डेव्हिस कप’ स्पर्धेत जे अवर्णनीय यश प्राप्त केले आहे, त्याची बरोबरी कोणताही अमेरिकन टेनिस खेळाडू करू शकलेला नाही. त्याच्या जन्मगावी म्हणजेच लास व्हेगास येथे तो समाजातील उपेक्षित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलांसाठी ‘आंद्रे आगासी कॉलेज प्रिपरेटरी अॅ्कॅडमी’ चालवतो.

[profiler]
Memory usage: real: 31981568, emalloc: 31282528
Code ProfilerTimeCntEmallocRealMem