Pathways to Greatness  : Coming Together for Change ( Marathi)

Pathways to Greatness : Coming Together for Change ( Marathi)

Author : APJ Abdul Kalam (Author) Meena Bhosale (Translator)

In stock
Rs. 225.00
Classification Society and Culture
Pub Date December 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 130
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647082
In stock
Rs. 225.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

महानतेच्या दिशेने...
एकत्र येऊया, बदल घडवूया

एखादं गंभीर आव्हान समोर उभं राहिल्यावर त्यावर यशस्वीपणे मात करतं; सोबतच स्वतःमधील सर्वोत्कृष्ट क्षमतांचं प्रदर्शन घडवतं, तेच राष्ट्र महान असतं. अशा राष्ट्रातील लोक समस्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करत त्या समस्येला पराभूत करतात. जागतिक क्रमवारीत भारताचा ज्या स्थानावर न्याय्य अधिकार आहे, ते गौरवशाली स्थान प्राप्त करण्यासाठी भारताला अजून खूप काही शिकावं लागेल आणि ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या पुस्तकात सांगतात. युवकांना, शिक्षकांना, शेतकर्‍यांना, सरपंचांना, आरोग्य कर्मचार्‍यांना, सनदी अधिकार्‍यांना, न्याय संस्थेतील कर्मचार्‍यांना, राजकीय नेत्यांना काही महत्त्वाचे संकल्प करण्यासाठी ते या पुस्तकातून आवाहनही करतात.

About the Author(s)

अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराचेही ते मानकरी होते. डॉ. कलामांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. भारताच्या पहिल्या उपग्रह संचलित वाहनाचा - एसएलव्ही- 3चा विकास; भारताच्या लष्करी डावपेचांच्या क्षेपणास्त्र प्रणालींची बांधणी व संचालन; आणि 1988च्या अणुचाचण्यांमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2020पर्यंत भारताचे रूपांतर एका विकसित राष्ट्रात करण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. या हेतूने, आयआयटी आणि आयआयएममध्ये अध्यापन कार्यासाठी, परिषदांमध्ये व्याख्याने देण्यासाठी आणि सर्व क्षेत्रांमधील विद्यार्थी व लोकांना भेटण्यासाठी ते सातत्याने देशभर प्रवास करतच राहिले.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18469696
Code ProfilerTimeCntEmallocRealMem