Sita  ( Marathi)

Sita ( Marathi)

Author : Devdutt Pattanaik

In stock
Rs. 599.00
Classification Mythology
Pub Date August 2015
Imprint Manjul Publishing House
Page Extent 356
Binding Perfect Paper Back
Language Marathi
ISBN 9788183225519
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

नगरीपासून दूर अरण्याच्या मधोमध सारथ्याने रथ थांबवला, वृक्षराजीमधून चालण्यासाठी अधीरतेने सीता उतरली. सारथी लक्ष्मण रथातच बसला होता. त्याला काहीतरी सांगायचे आहे हे जाणवून सीता थबकली. जमिनीकडे दृष्टी लावून शेवटी लक्ष्मण बोलला, "तुझा पती, माझा मोठा भाऊ, अयोध्येचा राजा राम याची इच्छा आहे की गावभर अफवा उठत आहेत. तुझ्या कीर्तीवर प्रश्नचि लागले आहे. याबाबतीत नियम स्पष्ट आहेतः राजाची पत्नी संशयाच्या पलीकडे असली पाहिजे. म्हणून रघुकुलाच्या वंशजाने तुला आज्ञा केली आहे की तू त्याच्यापासून, त्याच्या राजवाड्यापासून आणि त्याच्या नगरीपासून दूर राह्वंस. बाकी तुला आवडेल तिथे जाण्यास तू मुक्त आहेस. पण तू एकदा रामाची राणी होतीस हे तू कुणालाही उघड करून सांगणार नाहीस ."
सीतेला लक्ष्मणाच्या नाकपुड्या थरथरताना दिसल्या. तिला त्याचं अवघडलेपण आणि संताप कळला. पुढे जाऊन त्याला आश्वस्त करावं असं तिला वाटलं, पण तिने स्वतःला आवरलं.
"रामाने त्याच्या सीतेला टाकलं आहे असं तुला वाटतय, होय ना ?' तिने मृदुपणे विचारलं.
"पण तसं करूच शकत नाही.
तो देवी आहे - . तो कुणाचाच त्याग करत नाही.
आणि मी देवी आहे -. कुणीच माझा त्याग करू शकत नाही."
कोड्यात पडलेला लक्ष्मण अयोध्येला परतला. सीता वनात थांबली, हासील आणि तिने केस मोकळे सोडले.

About the Author(s)

देवदत्त पट्टनाईक हे शिक्षणाने मेडिकल डॉक्टर असून व्यवसायाने नेतृत्व-सल्लागार आहेत व आवडीने पुराणकथा अभ्यासक आहेत. त्यांनी पवित्र कथा, प्रतीके, विधी आणि त्यांची आधुनिक काळाशी संगती यावर भरपूर लेखन-व्याख्यान केले आहे. पेंग्विन इंडियाबरोबरच्या त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत द हांडबुक ऑफ राम, मिथ=मिथ्या, अ हांडबुक ऑफ हिंदू मायथोलाजी, द प्रेग्नेनट किंग, जयः अनइलस्ट्रेटेड रीटेलिंग ऑफ महाभारत आणि मुलासाठीची देवलोक माला. देव्दतांची अपारंपरिक पद्धत आणि गुंतवून टाकणारी शैली त्यांच्या व्याख्यानामधून, पुस्तकामधून आणि लेखामधून प्रत्ययाला येते.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18464112
Code ProfilerTimeCntEmallocRealMem