The Moment of Lift: How Empowering Women Changes the World (Marathi)

The Moment of Lift: How Empowering Women Changes the World (Marathi)

Author : Melinda Gates (Author); Savita Damle (Translator)

In stock
Rs. 350
Classification Non-Fiction
Pub Date Feb 2020
Imprint Manjul
Page Extent 276
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-93-89647-14-3
In stock
Rs. 350
(inclusive all taxes)
OR
About the Book

जगाच्या पाठीवर कुठेही राहणार्‍या आणि आत्यंतिक गरजांसाठी झगडणार्‍या लोकांच्या समस्यांवरील उत्तरं शोधण्याच्या कार्यात मागील वीस वर्षांपासून मेलिंडा गेट्स यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. या संपूर्ण कार्यप्रवासात त्यांना एक गोष्ट अधिकाधिक स्पष्ट झाली. ती म्हणजे समाजाचं उत्थान घडवायचं असेल, तर स्त्रियांचं दमन करणं थांबवलं पाहिजे. मेलिंडा गेट्स यांना आपल्या कार्यात आणि त्या निमित्तानं घडलेल्या जगभरच्या प्रवासात कित्येक प्रेरणादायी व्यक्ती भेटल्या. त्यांच्याकडून गिरवलेल्या धड्यांबद्दल मेलिंडा यांनी या पुस्तकातून सांगितलं आहे. बालविवाह, गर्भनिरोधकं न मिळणं इथपासून ते कामाच्या ठिकाणी ‘लिंग-असमानता’ असण्यापर्यंतच्या ज्या ज्या मुद्द्यांकडे लक्ष दिलंच पाहिजे, त्या मुद्द्यांविषयीच्या धक्कादायक तथ्यांवर आधारित असं अविस्मरणीय कथन त्यांनी या पुस्तकात केलं आहे.

About the Author(s)

एक परोपकारी व्यक्ती, उद्योजिका असणार्‍या मेलिंडा गेट्स या स्त्रियांच्या आणि मुलींच्या वतीने जागतिक स्तरावर आवाज उठवत असतात. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या सह-अध्यक्षा या नात्याने जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक कार्याची दिशा आणि प्राधान्यक्रम त्या ठरवत असतात. त्याचबरोबर त्यांनी ‘पिव्होटल व्हेंचर्स’ या इन्व्हेस्टमेंट आणि इन्क्युबेशन कंपनीची स्थापना केली आहे. अमेरिकेतील स्त्रियांची आणि कुटुंबांची सामाजिक प्रगती व्हावी, यासाठी ही संस्था कार्य करते.

[profiler]
Memory usage: real: 31981568, emalloc: 31280448
Code ProfilerTimeCntEmallocRealMem