Pahave Aapnasi Aapan ( Marathi)

Pahave Aapnasi Aapan ( Marathi)

Author : Milind Joshi

In stock
Rs. 199.00
Classification Self Help
Pub Date May 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 142
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789388241748
In stock
Rs. 199.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

अध्यात्म काय किंवा तत्त्वज्ञान काय, शेवटी जीवनातूनच उदयाला येत असतं, याचा बोध करून देणारा हा लेखसंग्रह आहे.
जन्म-मृत्यूच्या अवकाशात नाना प्रकारचे अनुभव घेता घेता माणूस जगण्याचा अर्थ शोधत राहतो आणि आपापल्या मर्यादेत त्या अर्थवत्तेने जगणं सुफळ करण्याचा प्रयत्न करत राहतो. या प्रयत्नांत त्याला जे गवसतं त्यांचीच वेचक मांडणी प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘पाहावे आपणासी आपण’ या पुस्तकातील लेखांमधून केली आहे.

About the Author(s)

स्वतः स्थापत्य अभियंते असूनही शब्दांचे इमले बांधणारे शब्दप्रभू ही प्रा. मिलिंद जोशी यांची मुख्य ओळख आहे. गेली कित्येक वर्षं अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहणारे मिलिंद जोशी लेखन, वक्तृत्व, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजक आणि विविध साहित्य संस्थांचे पदाधिकारी अशा अनेक भूमिका वठवत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष असणारे श्री. जोशी यांनी दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्रे यांत विपुल लिखाण केलं असून त्यांच्या सर्वच पुस्तकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. अनेक मान्यवर संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18454120
Code ProfilerTimeCntEmallocRealMem