Rahul Bajaj: An Extraordinary Life ( Marathi)

Rahul Bajaj: An Extraordinary Life ( Marathi)

Author : Gita Piramal (Author) Savita Damle (Translator)

In stock
Rs. 599.00
Classification Biography
Pub Date April 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 386
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431516
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

लेखिकेने या पुस्तकातून राहुल बजाज आणि त्यांचे विविध घडामोडींनी भरलेले खळबळयुक्त जीवन यांचे कसलाही आडपडदा न ठेवता चित्रण केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राहुल बजाज यांच्या आई तुरुंगात गेल्या होत्या, त्या प्रसंगापासून कहाणी सुरू होते आणि नव्या आशा मनाशी बाळगणाऱ्या एका स्वतंत्र देशातील प्रारंभीचे जीवन कसे होते, त्याची झलकच आपल्याला मिळू लागते. नवनव्या ‘स्टार्ट अप्स'च्या युगात ‘हमारा बजाज'च्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या माणसाच्या शाश्वत वारशाचे चित्रण गीता पिरामल यांनी अत्यंत कौशल्याने केले आहे. अत्यंत बारकाईचे निरीक्षण आणि सखोल अंतर्दृष्टी यांच्या जोडीला या चरित्रात कुटुंब, व्यवसाय आणि सार्वजनिक जीवन यांविषयीचे आणि समाजवस्त्रावर कधीही पुसला न जाणारा असा आपला छाप अंतिमतः कसा सोडून जावा याविषयीचे अतुलनीय धडेही चटकदार शैलीत दिले आहेत.

About the Author(s)

गीता पिरामल या भारतातील आघाडीच्या औद्योगिक इतिहासकार, संशोधक आणि वाचकप्रिय लेखिका आहेत. त्यांनी या पूर्वी बिझनेस महाराजाज अँड बिझनेस लिजंड्स हे पुस्तक लिहिले आहे. माजी पत्रकार या नात्याने त्यांनी कित्येक दशके विविध आंतरराष्ट्रीय आणि भारतीय प्रकाशनांत लेखन केलं आहे. त्यात इंग्लंड येथील फायनान्शियल टाइम्स आणि इकॉनॉमिक टाइम्स यांचा समावेश आहे. त्यांनी स्वतः द स्मार्ट मॅनेजर नामक व्यवस्थापन या विषयाची मुहूर्तमेढ रोवणारे एक मासिक काढले होते, तसेच बजाज समूहातील कंपन्यांसह भारतातील काही सुप्रसिद्ध कंपन्यांत त्यांनी संचालक पदावर कामही केले आहे. त्या सॉमरव्हिल कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथील सिनियर असोसिएट फेलो असून, मुंबई विद्यापीठातून इतिहास या विषयात त्यांनी बीए आणि एमए केले आहे, तसेच बिझनेस हिस्ट्री या विषयात पीएच. डी.ही केली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18424888
Code ProfilerTimeCntEmallocRealMem