Science of Breath: A Practical Guide

Science of Breath: A Practical Guide

Author : Swami Rama, Rudolph M. Ballentine, Alan Hymes (Authors) Dr. Hemangi Jambhekar (Translator)

In stock
Rs. 199.00
Classification Mind, Body, Spirit
Pub Date May 2022
Imprint Manjul
Page Extent 106
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924288
In stock
Rs. 199.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा अत्यावश्यक दुवा असून, श्वासामुळेच सूक्ष्म देहाला ऊर्जा प्राप्त होऊन त्यायोगे आपल्या अस्तित्वाचे भौतिक आणि मानसिक घटक जोडले जातात, असा योग-प्रवीण साधकांचा आणि आंतरिक विज्ञान गुरूंचा हजारो वर्षांपासून दावा आहे. या पुस्तकात स्वामी राम आणि इतर दोन उल्लेखनीय अमेरिकन फिजिशियन यांनी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दृष्टिकोनातून भारतीय ‘श्वासाचे विज्ञान' अभ्यासलं. शारीरिक आरोग्य आणि सजग जाणिवेच्या उच्चतम स्थितीचा शोध या दोन्हीतील हरवलेला दुवा या दुर्लक्षित विषयाच्या अभ्यासातून गवसू शकतो हे ते आपल्याला या पुस्तकातून सांगतात. जी श्वसन पद्धती हिमालयातले योगी आचरतात, त्यामागचं मूलभूत तंत्रदेखील स्वामी राम आपल्यासमोर या पुस्तकातून उलघडतात, जेणेकरून आपल्याला तातडीने या प्रभावी पुरातनशास्त्राचा अभ्यास करता येऊ शकेल.

About the Author(s)

स्वामी राम, यांनी हिमालयातील महायोगींपैकी एक असणाऱ्या हिमालयन इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. भारतात जन्मलेल्या स्वामी राम यांनी भारत आणि युरोप इथे शिक्षण पूर्ण केलं. हिमालयातील गुहांतील मठांतून आणि तिबेट इथे त्यांनी आध्यात्मिक शिक्षण प्राप्त केलं. लिव्हिंग विथ द हिमालयन मास्टर्स या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकातून या निष्णात आणि एकांड्या साधकाबद्दल अनेक बाबी उलगडतात, तसंच पूर्वेकडील परंपरांचं जितंजागतं दर्शन घडतं.
रुडॉल्फ बॅलेन्टाइन, एम.डी., हे अल्टरनेटिव्ह अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन क्षेत्रातील आघाडीचं नाव आहे. ड्युक युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलचे पदवीधर असणारे रुडॉल्फ युनायटेड स्टेट्स आणि इतर देशांत मोठ्या प्रमाणात व्याख्यानं देतात. रॅडिकल हिलिंग आणि डाएट अँड न्युट्रीशन - अ होलिस्टिक अप्रोच, ट्रान्झिशन टू व्हेजिटेरियानिझम - ॲन इव्होल्युशनरी स्टेप ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकं असून, त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलं आहे.
ॲलन हाईम्स, एम.डी., हे कार्डीओव्हॅसक्युलर आणि थोरॅसिक सर्जन असून, श्वास संदर्भात संशोधनात त्यांनी पुढाकार घेतला आहे. श्वासाच्या शैली आणि कार्डीओव्हॅसक्युलर आजार यांतील परस्परसंबंधांबद्दल त्यांचा अभ्यास आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18418976
Code ProfilerTimeCntEmallocRealMem