Shaley Prashasan aani Manavi Sambandh ( Marathi)

Shaley Prashasan aani Manavi Sambandh ( Marathi)

Author : Dr. Vasant Kalpande

Out of stock Notify Me
Rs. 299.00
Classification
Pub Date May 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 180
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430335
Out of stock Notify Me
Rs. 299.00
(inclusive all taxes)
About the Book

या पुस्तकातील लेख हे लेखक डॉ. वसंत काळपांडे यांच्या प्रशासकीय अनुभवांची, प्रशासनविषयक चिंतनाची आणि चौफेर वाचनाची साक्ष देतात. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांशी व मुख्याध्यापकांशी एक प्रकारे काहीसे अनौपचारिक असे हितगूज केलेले दिसून येते. प्रयोगशील मुख्याध्यापकांसमोर तसेच शिक्षकांसमोर येणार्‍या अध्यापनविषयक, प्रशासकीय स्वरूपाच्या आणि शिक्षक-पालक संबंधांविषयीच्या अनेकविध समस्यांची उकल कशी करावी, याचे मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकातून केले आहे. शालेय वातावरणात विद्यार्थ्यांचा विविधांगी विकास साधत असताना शिक्षक-शिक्षक, शिक्षक-मुख्याध्यापक, शिक्षक-पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थी या व अशा परस्पर संबंधांतून उद्भवणार्‍या समस्यांची दखल लेखकाने घेतली असून, केवळ तात्त्विक चर्चा न करता उदाहरणे देऊन प्रत्येक समस्या स्पष्ट केली आहे. शिक्षण संस्थांमध्ये विविध स्तरांवर कार्य करणार्‍या प्रशासकांना व अध्यापकांना त्यांच्या कार्यात या पुस्तकामुळे बहुमोल मार्गदर्शन मिळेल. अध्यापक विद्यालये आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालये यातून काम करणार्‍या प्राध्यापकांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.

About the Author(s)

डॉ. वसंत काळपांडे यांची 1972मध्ये एम. एससी. होताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिक्षणाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी 35 वर्षे विविध पदांवर काम केले. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक म्हणून ते निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही ते विविध संस्था, संघटना आणि व्यक्ती यांना शिक्षणविषयक विनामोबदला सल्ला व मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी शैक्षणिक प्रशासन आणि धोरण या क्षेत्रांत मराठीत आणि इंग्रजीत पुस्तके आणि लेख लिहिले आहेत. त्यांच्या शालेय प्रशासन आणि मानवी संबंध या पुस्तकाला 1992चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांतून सुमारे 100पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18474824
Code ProfilerTimeCntEmallocRealMem