Devi Vanamali's Shri Ram Leela (Marathi)

Devi Vanamali's Shri Ram Leela (Marathi)

Author : Vanamali (Author) Madhuri Talwalkar (Translator)

In stock
Rs. 399.00
Classification Religion/Spirituality
Pub Date 25th February 2024
Imprint Manjul Publishing House
Page Extent 260
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355437778
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

लेखिकेने महान कवी वाल्मीकी यांचे मूळ संस्कृत शब्दप्रयोग आणि मौखिक परंपरागत कथा यांवर संस्करण केले. त्यांनी प्रेम, कर्तव्य आणि बलिदान यांची प्राचीन भारतातील रामायण ही कथा आधुनिक वाचकांसाठी पुन्हा वर्णन करून सांगितली आहे. विष्णूचे सातवे अवतार प्रभू श्री रामचंद्र यांचे जीवन आणि धर्म यांचे लेखिकेने विवरण केले. यातून रामांनी कशा प्रकारे धर्माशी सत्यनिष्ठ राहून दिव्यता प्राप्त केली हे त्यांनी सांगितले. अमंगल शक्तींविरुद्ध रामांनी केलेल्या युद्धातून साहस व निष्ठा, आध्यात्मिक भ्रम व निरर्थक आसक्ती आणि मानवी व दिव्य प्रेमाची क्षमता यांचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. या अमर कथेतील गूढ विचारधारा आणि श्रेष्ठ ज्ञान यांमधून लेखिकेने ‘राम’ हे पात्र कसे हजारो वर्षांपासून भक्तांना मोहित करते आहे, हे दाखवले आहे. कारण, त्यांची कथा मानवी स्वभावातील श्रेष्ठ गुणांना आकर्षित करणारे सनातन सत्य दाखवते. लेखिकेने हे लक्षात आणून देतात की, राम हे विष्णूचे अवतार असले तरी त्यांच्यातही आसक्ती, कामना आणि क्रोध असे मानवाला दुर्बल करणारे गुण होते. चारित्र्यातील अशा दुर्बलतेवर रामांनी मात केली, यात त्यांची महानता आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या इच्छांपेक्षा आपल्या आध्यात्मिक कर्तव्यास अधिक महत्त्व दिले. स्वतःची गुणवत्ता वाढवून ते महामानव झाले. ज्यांच्यावर त्यांचे निरतिशय प्रेम होते, त्या सर्वांचे त्यांनी रक्षण केले. रामांच्या जीवनातून हे पाहण्यास मिळते की, आपण कितीही दुर्बल असलो तरी समर्पण, निष्ठा, तळमळ आणि प्रेम यांच्या साह्याने आश्चर्यजनक कार्य करू शकतो.

About the Author(s)

वनमालींनी हिंदू देवी-देवतांवर आधारित जी पुस्तके लिहिली आहेत, त्यांमध्ये श्री कृष्ण लीला, श्री हनुमान लीला, श्री शिव लीला आणि शक्ती तसेच भगवद्गीता यांचा इंग्रजी अनुवाद ही प्रमुख पुस्तके आहेत. त्या वनमाली गीता योग आश्रमाच्या ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्ष आहेत. ही संस्था सनातन धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करते. मुलांना समर्पित वृत्तीने धर्मार्थ सेवा देते. त्या उत्तर भारतातील ऋषिकेशमध्ये असलेल्या वनमाली आश्रमात राहतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18431056
Code ProfilerTimeCntEmallocRealMem