Stories I Must Tell (Marathi)

Stories I Must Tell (Marathi)

Author : Kabir Bedi (Author) Mukund Vaze (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Autobiography
Pub Date Feb 2022
Imprint Manjul
Page Extent 306pp + 8 photo pages
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431080
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकातील कथा अतिशय रोखठोक आहेत. ज्याने प्रेमात किंवा आत्मकथनात काहीच हातचं राखलं नाही, अशा माणसाच्या या लक्षवेधी आठवणी आहेत. ही कहाणी आहे दिल्लीतील एका मध्यमवर्गीय अशा मुलाची ज्याचे कार्यक्षेत्र आज जगभर विस्तारले आहे. या पुस्तकातून कबीर बेदी आपलं अंतःकरण उघडे करतो. दिल्लीतील बीटल्स बरोबरची जादूभरी भेट - मित्र, घर आणि कॉलेज; सारं मागे सोडून मुंबईला घेतलेली धाव - जाहिरात क्षेत्रात त्याने व्यतीत केलेली उद्दीपित करणारी वर्षं; परदेशात मिळवलेले नेत्रदीपक यश आणि अनेक वेदनाकारक पिछेहाटी. अनिवार आयुष्य जगणारी प्रतिमा बेदी आणि झळाळणारी परवीन बाबी यांच्याशी त्याचे जुळलेले आणि विस्कटलेले भावबंध - त्यामुळे त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्या संबंधांतून त्याच्या मनावर उमटलेल्या जखमा आणि त्याने घेतलेल्या तीन घटस्फोटांनी केलेली त्याच्या जीवाची ससेहोलपट आणि अखेर त्याला मिळालेले समाधान आणि तृप्ती! त्याच्या सर्व श्रद्धा कशा आणि का बदलल्या हेही या आत्मकथनातून स्पष्ट दिसते.

About the Author(s)

कबीर बेदी दूरदर्शनवर आजही अभिनेता आणि निवेदक म्हणून कार्यरत आहे. जाहिरातपट आणि चित्रपट यांना तो ध्वनिसाहाय्य करतो. कबीरचे औदार्य आणि सामाजिक कार्याबद्दलची बांधिलकी सर्वज्ञात आहे. दृष्टिदोषाने बाधित असलेल्या व्यक्तींना दृष्टिदान मिळवून देणार्‍या SightSavers India या संस्थेचा कबीर सदिच्छादूत आहे. रस्त्यावर राहणार्‍या मुलांना प्राथमिक शाळेपासून ते थेट विद्यापीठीय शिक्षण आणि अन्य मदत देणारी Care and Share Italia नावाची एक संस्था आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत कार्यरत आहे. कबीर या संस्थेचाही सदिच्छादूत आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18412336
Code ProfilerTimeCntEmallocRealMem