The Archer ( Marathi)

The Archer ( Marathi)

Author : Paulo Coelho (author) Dr. Shuchita Phadke (translator)

In stock
Rs. 250.00
Classification Fiction
Pub Date March 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 158
Binding Hardcover
Language Marathi
ISBN 9788195041589
In stock
Rs. 250.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

द अल्केमिस्ट या पुस्तकाच्या नंबर वन बेस्टसेलिंग लेखकाच्या या प्रेरक कथेमध्ये एक युवक एका वृद्धाकडून शहाणपणाच्या गोष्टी आणि व्यावहारिक धडे शिकतो.
या पुस्तकात आपण तेत्सुयाला भेटतो. तेत्सुया, एके काळी धनुर्विद्येमध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेसाठी प्रसिद्ध होते परंतु आता सार्वजनिक जीवनातून ते निवृत्त झाले आहेत. एक मुलगा त्यांना शोधत येतो. त्याच्या मनात कित्येक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं देताना तेत्सुया धनुष्याची कार्यपद्धती सांगतात आणि अर्थपूर्ण जीवनाचे सिद्धान्त प्रकट करतात. पाउलो कोएलो यांची ही कथा स्पष्ट करते की, कर्म आणि आत्मा यांच्या मिलाफाशिवाय जगण्याचं समाधान मिळत नाही आणि नाकारले जाण्याच्या किंवा अपयशाच्या भीतीमुळे संकुचित जीवन जगणं योग्य ठरत नाही. याऐवजी मनुष्याने जोखीम उचलली पाहिजे, धाडसी बनलं पाहिजे आणि जीवनाच्या अनपेक्षित यात्रेसाठी तयार राहायला पाहिजे.
बुद्धिमत्ता, औदार्य, साधेपणा आणि विनयशीलता या ज्या गुणांनी कोएलो यांना आंतरराष्ट्रीय बेस्टसेलिंग लेखक बनवलं, त्या आधारेच त्यांनी यशस्वी जीवनाची रूपरेषा प्रस्तुत केली आहे : कठोर परिश्रम, उत्साह, उद्देश, विचारसरणी, अपयशाचा स्वीकार आणि जगामध्ये बदल घडवून आणण्याची इच्छा.

About the Author(s)

पाउलो कोएलो यांचं जीवन त्यांच्या पुस्तकांचा मूळ प्रेरणास्रोत आहे. त्यांनी मृत्युचा सामना केला, वेडेपणाचं टोक गाठलं, मादक पदार्थांचं सेवन केलं, यातना झेलल्या, जादूचे आणि हातचलाखीचे प्रयोग केले, तत्त्वज्ञानाचा आणि धर्माचा सखोल अभ्यास केला, आत्मविश्वास गमावला आणि पुन्हा प्राप्त केला आणि प्रेमातील वेदना व आनंद अनुभवला. जगामध्ये स्वतःचं स्थान शोधताना त्यांनी त्या आव्हानांची उत्तरं शोधली, ज्यांना प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागतं. ते असं मानतात की, आपलं नशीब जाणण्यासाठी ज्या शक्तीची आपल्याला आवश्यकता असते, ती आपल्या आतमध्येच असते.
आतापर्यंत त्यांच्या पुस्तकांचा 82 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि 170पेक्षा अधिक देशांमध्ये 32 कोटींपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे. 1998मध्ये त्यांनी लिहिलेल्या द अल्केमिस्ट या कादंबरीच्या 8.5 कोटींपेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली आहे. द अल्केमिस्टला मलाला युसूफझाई आणि फॅरेल विलियम्ससारख्या लोकांनी आपला प्रेरणास्रोत मानलं आहे.
ते ब्राझिलियन अ‍ॅकेडमी ऑफ लेटर्सचे सदस्य आहेत आणि त्यांना ‘शेवलिअर् द लॉरद्रे नॅशनल द ला लिजन ऑनर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2007मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे ‘मेसेंजर ऑफ पीस’ म्हणून त्यांना नियुक्त केले होते.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18464656
Code ProfilerTimeCntEmallocRealMem