The Forty Rules of Love (Marathi)

The Forty Rules of Love (Marathi)

Author : Elif Shafak

In stock
Rs. 399
Classification Fiction
Pub Date November 2020
Imprint Manjul
Page Extent 478
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390085583
In stock
Rs. 399
(inclusive all taxes)
OR
About the Book

आपला नवरा आणि तीन किशोरवयीन मुलांबरोबर एला रुबिनस्टाईन एका सुंदर घरात राहत असते. आत्मविश्‍वास आणि समाधान वाटावं अशी प्रत्येक गोष्ट तिच्याकडे आहे, तरीदेखील तिच्या जीवनात रिक्तता आहे. कोणे एकेकाळी ही रिक्तता प्रेमाने परिपूर्ण होती, त्यामुळेच तेराव्या शतकातील सूफी कवी रुमी आणि शम्स तब्रीझी व जीवन आणि प्रेमाची त्यांची चाळीस सूत्रं यांबद्दल ती जेव्हा एक हस्तलिखित वाचते, तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. कुटुंबाकडे पाठ फिरवून ती जीवनप्रवास सुरू करते. त्या हस्तलिखिताच्या गूढ लेखकाचा शोध तिला घ्यायचा असतो. सूफी गूढवाद आणि काव्य यांच्याशी सांगड घालणारा हा शोध काळजाला हात घालत एला समवेत आपल्यालादेखील विश्‍वास, श्रद्धा आणि प्रेमाच्या विलक्षण प्रदेशात घेऊन जातो... माहितीपूर्ण, मंत्रमुग्ध करणारं असं हे पुस्तक आहे.

About the Author(s)

एलिफ शफक यांच्या नावावर ‘द बास्टर्ड ऑफ इस्तंबूल’, ‘द फ्ली पॅलेस’ आणि ‘ऑनर’ यासह नऊ कांदबर्‍या जमा आहेत. टर्कीमध्ये (तुर्कस्तान) त्यांचं लेखन मोठ्या प्रमाणात वाचलं जातं, तसंच चाळीस भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. द न्यू यॉर्क टाईम्स, फायनान्शियल टाईम्स, गार्डियन, इन्डिपेन्डन्ट, ल रिपब्लिका, न्यूजवीक आणि टाईम मॅगेझीन सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांचं योगदान असतं. द लंडन स्पीकर ब्यूरोसाठी त्या वक्ता म्हणून कार्य करतात.

[profiler]
Memory usage: real: 31981568, emalloc: 31229648
Code ProfilerTimeCntEmallocRealMem