The Girl On The Train (Marathi )

The Girl On The Train (Marathi )

Author : Paula Hawkins (Author) Ulka Raut (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Crime Fiction
Pub Date 25th August 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 340
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430427
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

रेचल रोज सकाळी हीच गाडी पकडते. गाडी रोज त्याच सिग्नलजवळ थांबते. तिथून एका रांगेतली पाठमोरी घरं आणि घरांच्या पाठीमागे असलेले बगिचे दिसतात. रोज पाहून पाहून त्यांपैकी एका घरात राहणाऱ्या लोकांना आपण चांगलं ओळखतो, असं रेचलला वाटायला लागलंय. त्यांना एकत्र पाहून त्यांचं आयुष्य किती परिपूर्ण आहे, असंही तिला वाटतंय. रेचलही त्यांच्यासारखीच सुखी असती तर? ...आणि एक दिवस तिने त्या घरातील एक धक्कादायक घटना पाहिली आणि ते परिपूर्ण चित्र खराब झालं...ज्यांच्या आयुष्यात रेचल आजवर फक्त दूरवरून डोकावत होती, त्या आयुष्याचा एक भाग होण्याची संधी तिच्यापुढे चालून आली होती. आता सर्वांना समजेल, ती गाडीमधून रोज ये-जा करणारी सर्वसामान्य मुलगी नाही. तिच्यामध्ये आणखीही काही खास आहे! हे पुस्तक म्हणजे वेगवान, तणावपूर्ण, अप्रतिम उत्कंठावर्धक कादंबरी आहे.

About the Author(s)

पॉला हॉकिन्सने काल्पनिक कथांकडे वळण्यापूर्वी पंधरा वर्षं पत्रकार म्हणून काम केलं. पॉलाची पहिली थरारक कादंबरी द गर्ल ऑन द ट्रेन ही आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवलेली कादंबरी आहे. जगभरात आतापर्यंत तिच्या 2 कोटींपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे. ही कादंबरी 40हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे, तसंच ती जगातील नंबर 1 बेस्टसेलर कादंबरी ठरली आहे. यावर आधारित एक चित्रपटही बनवण्यात आला.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18423112
Code ProfilerTimeCntEmallocRealMem