The Heartfulness Way: Heart-Based Meditations For Spiritual Transformation ( Marathi)

The Heartfulness Way: Heart-Based Meditations For Spiritual Transformation ( Marathi)

Author : Kamlesh D. Patel and Joshua Pollock

In stock
Rs. 350.00
Classification Self Help / Spirituality
Pub Date March 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 184
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355432599
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

आपले नातेसंबंध, कारकीर्द, संपत्ती आणि आरोग्य यांच्याशी संबंधित विविध गरजा पूर्ण करत असताना आपल्याला अनेकदा पोकळी जाणवते. आपल्या आयुष्यात अनेक केंद्रे आहेत, तरीही आपले खरे केंद्र कुठे आहे - प्रत्येक हृदयाच्या गाभ्यामध्ये अस्तित्वात असलेले असे केंद्र? आध्यात्मिक शोधाच्या स्वरूपाचा अभ्यास करताना, ते साधकाच्या प्रवासाचे वर्णन करतात. दाजी बोधप्रद संभाषणांच्या मालिकेद्वारे हार्टफुलनेस साधनेची आणि तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे प्रकट करतात. प्रार्थना आणि यौगिक संप्रेषणाच्या सारतत्त्वावर चिंतन करण्यापासून ते व्यावहारिक सल्ल्यांद्वारे ध्यान प्रक्रियेचे रहस्य उलगडून दाखवत हे पुस्तक तुम्हाला स्वतःला केंद्रित करून खरा अर्थ व समाधान शोधण्यास शिकवते.

About the Author(s)

कमलेश डी. पटेल यांना सर्वत्र दाजी म्हणून ओळखले जाते. 100 वर्षे जुन्या आध्यात्मिक गुरुपरंपरेचे उत्तराधिकारी म्हणून घोषित होण्यापूर्वी तीन दशके ते न्यू यॉर्क शहरात औषधविक्रीच्या व्यवसायात होते. आधुनिक काळातील गुरूंची अनेक कर्तव्ये पार पाडत असताना, सगळीकडच्या आध्यात्मिक साधकांना साहाय्य करण्यासाठी ते सर्वदूर प्रवास करीत असतात. स्वतःला आध्यात्मिकतेचा विद्यार्थी म्हणवून घेत, ते त्यांचा बहुतांश वेळ आणि शक्ती चेतनेच्या आणि आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात संशोधन करण्यात व्यतीत करतात.

जोशुआ पोलॉक हे संयुक्त राष्ट्रातील हार्ट फुलनेस प्रशिक्षक व साधक. पाश्चिमात्य शैलीतील सुप्रसिद्ध शास्त्रीय व्हायोलीन वादक, ज्यांनी जगभरात कार्यक्रम करून प्रशिक्षणही दिले आहे. ज्यात ए. आर. रेहमान यांच्याबरोबर एकत्रितपणे केलेल्या अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. पोलॉक हे समर्पित आध्यात्मिक साधक असून, आपल्या ध्यानाविषयीच्या उत्कट आवडीविषयी अनेक चर्चासत्रांमध्ये उत्साहाने व्याख्याने देतात, अनेक व्यावसायिक, शैक्षणिक व शासकीय संस्थांमध्ये ध्यानाच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करतात, तसेच स्थानिक साधकांना सतत वैयक्तिक स्तरावर साहाय्य पुरवित असतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18435664
Code ProfilerTimeCntEmallocRealMem