The Idol Thief ( Marathi)

The Idol Thief ( Marathi)

Author : S. Vijay Kumar

In stock
Rs. 299.00
Classification Non-Fiction
Pub Date Feb 2020
Imprint Manjul Publishing House
Page Extent 172
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647266
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

तामिळनाडूतील दोन मंदिरांतील धाडसी मूर्तिचोरी प्रकरणी न्यू यॉर्क येथे पुराणवस्तू विक्री करणार्‍या सुभाष कपूर यांचा हात असल्याचं लक्षात घेऊन भारताने त्यांच्या अटकेसाठी काही आठवडे आधी ‘रेड-कॉर्नर-नोटीस’ जारी केली होती. त्यानुसार, यूएस अधिकार्‍यांनी न्यू यॉर्कयेथील कपूर यांच्या वेअरहाउसवर धाड घातली असता मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं. ‘जगातील सर्वांत कुप्रसिद्ध तस्करांपैकी एक’ अशी यूएसने त्यांची संभावना केली. एक मूर्तिप्रेमी वर्षानुवर्षं कपूरच्या मागावर होता. आजही तो कपूरच्या हातून विकल्या गेलेल्या मूर्तींचा शोध घेत आहे. ही त्यानेच सांगितलेली, अशक्यप्राय वाटणारी सत्यकथा आहे. दक्ष पोलीस ऑफिसर, म्युझियमचे भ्रष्ट अधिकारी, प्रियकराचा सूड घेणारी मैत्रीण, दुतोंडी अभ्यासक, मंदिरात लुटमार करणारे भुरटे चोर आणि तस्कर अशा अनेक व्यक्तिरेखांची या पुस्तकात रेलचेल आहे. भारतीय मंदिरात झालेल्या 21व्या शतकातील या लुटमारीने आणि समाजकंटक गुन्हेगारांच्या धाडसाने थक्क करणारे असे हे पुस्तक आहे.

About the Author(s)

अर्थशास्त्र आणि शिपिंग (जहाज मालवाहतूक) यांचे तज्ज्ञ असलेले एस. विजय कुमार एका आघाडीच्या महासागर वाहतूक कंपनीचे सरव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) आहेत. poetryinstone.in या नावाने त्यांनी 2007-08मध्ये भारतीय कला या विषयाला वाहिलेला ब्लॉग सुरू केला. भारत आणि युनायटेड स्टेट्सच्या कायदा अंमलबजावणी एजन्सीतर्फे मूर्तिचोरी आणि तस्करी या संदर्भात सुरू असलेल्या तपासणीमध्ये त्यांनी 2010मध्ये सक्रिय सहभाग द्यायला सुरुवात केली. अनेक मूर्तिचोर आणि तस्करांना अटक करण्यामध्ये विजय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18456328
Code ProfilerTimeCntEmallocRealMem