The Mahabharata Secret ( Marathi)

The Mahabharata Secret ( Marathi)

Author : Christopher C. Doyle

In stock
Rs. 350.00
Classification Fiction
Pub Date 15 August 2018
Imprint Manjul Publishing House
Page Extent 436
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789387383760
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

महान सम्राट अशोकाला जगाचा विनाश करणाऱ्या एका प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध लागला होता. महाभारतात खोलवर ते रहस्य गाडून, 2300 वर्षांपूर्वी ते रहस्य जगापासून लपवून ठेवण्यात आलं होतं. काही हजार वर्षांनी त्या रहस्यामुळेच एका निवृत्त अणुशास्त्रज्ञाचा खून होतो. आपल्या पुतण्यासाठी तो केवळ ई-मेलच्या माध्यमातून काही संकेत ठेवतो. गुप्त प्राचीन सांकेतिक लिपीतील संकेतांमधून आणि 2,000 वर्षांपूर्वीच्या अवशेषांमधून त्याचा पुतण्या आणि त्याचे मित्र त्याच्या ई-मेलची उकल करतात. यांच्या या शोधमोहिमेत ते शक्तिशाली दुष्ट शक्तींच्या पाठलागामुळे भूतकाळातील रहस्ये आणि वर्तमानातील कारस्थाने यांच्या कचाट्यात सापडतात. शब्दांत मांडता न येण्याजोग्या भयानक दहशतीचा पगडा जगावर बसण्याआधी ‘ते’ गूढ ते उकलू शकतात का?

About the Author(s)

क्रिस्टोफर सी. डॉयल यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली असून, कोलकात्याच्या आरआरएममधून बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास केला आहे. व्यवस्थापन आणि व्यापार या विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्याने देण्यासाठी क्रिस्टोफर यांना आमंत्रित केले जाते. एका अमेरिकन कंपनीच्या भागीदारीत त्यांनी भारतात एका स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्सीची स्थापना केली. ते एक मान्यताप्राप्त ‘एक्झिक्युटिव्ह कोच’ म्हणूनही ओळखले जातात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18454920
Code ProfilerTimeCntEmallocRealMem