About the Author(s)
सुनील कांत मुंजाल हे हिरो समूहाचे संस्थापक ब्रिजमोहन लाल मुंजाल यांचे सर्वांत कनिष्ठ चिरंजीव आहेत. अनेक नवीन उद्योगांची स्थापना करणं आणि हिरो समूहाला व्यूहरचनात्मक विचार व कल्पना देण्याबरोबरच त्यांनी हिरो मोटोकॉर्पचे (आधीची हिरो-होंडा ) संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केलं आहे. सध्या ते हिरो एंटरप्राइजचे अध्यक्ष आहेत. त्यांना वैविध्यपूर्ण सेवांमध्ये आणि उत्पादन व्यवसायांमध्ये रस आहे. त्यांनी भारतातील आणि परदेशातीलही ई कॉमर्सपासून आतिथ्यशीलतेपर्यंतच्या अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणुकी केल्या आहेत. कुटुंबाच्या विविध ट्रस्टकडून व्यवस्थापन करण्यात येत असलेल्या उच्च शिक्षण, आरोग्य देखभाल आणि क्षमता उभारणी प्रकल्पांची ते सक्रियपणे देखभाल करत आहेत. त्यांनी कलेला दिल्या जाणाऱ्या आश्रयाचं पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूनं सेरेन्डिपिटी आर्ट्स फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनमार्फत सध्या ते जगातील सर्वांत मोठ्या बहुविषयक महोत्सवांपैकी एक असलेल्या महोत्सवाचं आयोजन करतात.