About the Book
‘जीवन आणि मरण यांच्या उंबरठ्यावर विचारांच्या पलीकडचे एक वाचनगृह असते,’ त्या म्हणाल्या, ‘आणि त्या वाचनगृहात कधीच न संपणारी शेल्फ्स असतात. त्यातल्या प्रत्येक पुस्तकात एक नवीन आयुष्य जगून पाहण्याची संधी असते. हे पाहण्यासाठी की, तुम्ही दुसरे पर्याय निवडले असते, तर तुमचं आयुष्य वेगळं कसं बनलं असतं... तुम्हाला तुमची खंत पुसून टाकता आली असती, तर तुम्ही काही वेगळं केलं असतं का?’
हेगच्या कादंबर्यांमधून दैनंदिन जीवनाच्या पलीकडील विलक्षण सौंदर्याची प्रचिती येते.
About the Author(s)
मॅट हेग यांनी प्रौढांसाठी हाउ टू स्टॉप टाइम, द ह्यूमन्स, द रॅडलीज अशा अत्यंत सुप्रसिद्ध सहा कादंबर्याही लिहिल्या आहेत. त्यांनी लहान आणि किशोरवयीन मुलांसाठीही लेखन केलं आहे. यासाठी ब्लू पीटर बुक अॅवॉर्ड आणि द स्मार्टीज बुक प्राइझ या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं असून, कार्नेगी मेडलसाठी त्यांना तीन वेळा नामांकन मिळालं आहे. यू. के.मध्ये त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे आणि त्यांच्या पुस्तकांचे जगभरात चाळीसहून अधिक भाषांत अनुवाद झाले आहेत.