About the Book
या पुस्तकात छोटी आणि सुबोध कथा आहे. जी ‘एका मिनिटाचे ध्येय’, ‘एका मिनिटाची प्रशंसा’ आणि ‘एका मिनिटाचे पुनःमार्गदर्शन (नवीन तिसरे रहस्य)’ ही तीन महत्त्वाची रहस्यं आपल्यासमोर उलगडते. ही कथा व्यवहाराधिष्ठित विज्ञान आणि चिकित्सा अध्ययनांवर आधारित आहे. वरकरणी सहजसोपे दिसणारे हे मार्ग असंख्य लोकांच्या बाबतीत इतक्या उत्तम पद्धतीने कसे काम करतात, हेच ही कथा सांगते. यात सांगितलेल्या गोष्टी स्वतःच्या जीवनात वापरल्याने तुम्हाला त्यांचा लाभ कसा होऊ शकतो, हे या पुस्तकातून कळते.
About the Author(s)
केन ब्लँचर्ड विश्वातील सर्वांत प्रभावी नेतृत्वतज्ज्ञांपैकी एक आहेत. ते 60हून अधिक पुस्तकांचे सहलेखक आहेत ज्यात रेविंग फॅन्स आणि गंग हो! (शेल्डन बाउल्स यांच्यासह) या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट पुस्तकांचा 40पेक्षा अधिक भाषांत अनुवाद झाला आहे.
डॉ. स्पेन्सर जॉन्सन जगभरातील सर्वाधिक प्रशंसित प्रेरणादायी नेत्यांपैकी आणि सर्वाधिक वाचल्या जाणार्या लेखकांपैकी एक आहेत. त्यांची पुस्तकं आपल्या जीवनाचा, संस्कृतीचा एक भागच झाली आहेत. यात हू मूव्ह्ड माय चीज या नंबर वन बेस्टसेलर पुस्तकाचा समावेश आहे. स्पेन्सर जॉन्सन यांच्या पुस्तकांच्या 5 करोडहून अधिक प्रती 47 भाषांमध्ये जगभरात वाचल्या जातात