The Richest Man in Babylon

The Richest Man in Babylon

Author : George S. Clason (Author) Ashwini Kanthi (Translator)

In stock
Rs. 199.00
Classification Self Help
Pub Date December 2022
Imprint Manjul
Page Extent 157
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430953
In stock
Rs. 199.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

धन, आर्थिक नियोजन आणि वैयक्तिक मालमत्ता या विषयांवरील हे ‘सर्वांत प्रेरणादायी पुस्तक’ समजले जाते. सोप्या भाषेत लिहिलेल्या या मनोरंजक आणि माहितीपूर्ण गोष्टी तुम्हाला आर्थिक यशाचा मार्ग दाखवतात आणि सुख-समृद्धीच्या ध्येयाकडे घेऊन जातात. या बेस्टसेलर पुस्तकामध्ये आर्थिक समस्यांवरची आयुष्यभर उपयोगी पडणारी उत्तरे मिळतील. धन मिळवण्याची, धनाचा संचय करण्याची आणि धन वाढवण्याची अचूक रहस्ये या पुस्तकात सांगितलेली आहेत. या पुस्तकात सांगितलेल्या सिद्धान्तांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकाल आणि तुमची स्वप्ने साकार करू शकाल. या पुस्तकात श्रीमंत होण्याची गुरूकिल्ली दिलेली आहे.

About the Author(s)

जॉर्ज सॅम्युअल क्लासन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्कामध्ये शिक्षण घेतले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धात ते अमेरिकेच्या बाजूने लढले. त्यांनी ‘क्लासन मॅप कंपनी ऑफ डेन्व्हर, कोलोरेडो’ची स्थापना केली आणि अमेरिका-कॅनडामधील रस्त्यांचा पहिला नकाशा प्रसिद्ध केला. 1926 मध्ये, त्यांनी ‘बचत आणि आर्थिक यश’ या विषयावरच्या पत्रकांची पहिली मालिका प्रसिद्ध केली. त्यातील प्रत्येक मुद्दा पटवून सांगण्याकरता प्राचीन बॅबिलॉनमधील बोधकथांचा वापर केला. ही पत्रके बँकांनी आणि विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या ग्राहकांमध्ये वितरित केली. लाखो लोकांनी या कथा वाचल्या आणि त्यांचा लाभ घेतला. बॅबिलॉनच्या या बोधकथांना आधुनिक काळातील प्रेरणा देणारे अभिजात साहित्य मानले जाते.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18411464
Code ProfilerTimeCntEmallocRealMem