About the Book
पारशी समाजाच्या शौर्यगाथेचे बहुरंगी पैलू उत्तम संशोधनांती या माहितीपूर्ण पुस्तकात आले आहेत. अत्यंत अल्पसंख्याक म्हणता येईल, अशा या समाजानं निव्वळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात मिळवलेल्या विस्मयकारी आणि अपूर्व यशाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. लेखिकेने अत्यंत आत्मीयतेनं लिहिलेल्या पारशी समाजाच्या या खिळवून ठेवणार्या प्रदीर्घ आलेखात अनेक व्यक्ती, संस्था, त्यामागच्या कहाण्या, त्यांनी मिळवलेलं यश आणि त्यांचा आजही सुरू असलेला निरंतर प्रवास यांचा सखोल ऊहापोह केला आहे. भारतातल्या पारश्यांचं स्थान उलगडत असतानाच दुसरीकडे तनछोई रेशमाच्या आणि चिकू उत्पादनापर्यंतच्या विविध क्षेत्रांत विलक्षण कामगिरी बजावता बजावता हे लोक भारतीय समाजाचा कसा अविभाज्य घटक होऊन गेले, यांवर त्यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.