About the Book
22 मार्च, 2016... तो खरंच एक दुर्दैवी दिवस होता... ब्रुसेल्सहून नेवार्कला जाणार्या विमानात केबिन-क्रू-मॅनेजरची जबाबदारी निधी चाफेकर यांच्यावर होती. त्या दिवशी दहशतवाद्यांनी ब्रुसेल्स विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणला. या हादरवून टाकणार्या हल्ल्यात बत्तीस जणांचे प्राण गेले आणि तीनशेहून अधिक लोक जखमी झाले. निधीसुद्धा या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाल्या. स्फोटानंतर काही मिनिटांनी टिपण्यात आलेला त्यांचा फोटो या दहशतवादी हल्ल्याचा जणू चेहराच झाला. दहशतवादी हल्ल्याच्या या वावटळीत अनेकांची आयुष्यं अक्षरशः हादरून गेली. या तीव्र धक्कादायक प्रसंगातून आणि त्यानंतरच्या नियमित वैद्यकीय उपचारांतून उभ्या राहिलेल्या निधी चाफेकर या पुस्तकात जणू एखाद्या झुंजार नायिकेप्रमाणे आपल्यासमोर येतात. त्यांची ही कथा तुम्हाला श्वास रोखून धरायला लावेल आणि त्याच वेळी अनोख्या ऊर्जेने भारूनही टाकेल.