Wabi Sabi (Marathi)

Wabi Sabi (Marathi)

Author : Nobuo Suzuki (Author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (Translator)

Out of stock Notify Me
Rs. 399.00
Classification Self Help
Pub Date 25 Oct 2022
Imprint Manjul
Page Extent 180
Binding Hard cover
Language Marathi
ISBN 9789355430830
Out of stock Notify Me
Rs. 399.00
(inclusive all taxes)
About the Book

तुम्ही आणि तुमचं अपरिपूर्ण जीवन तुम्हाला वाटतं त्याहून खरोखरच कसं अधिक उत्तम आहे, स्वीकार करणं आणि सोडून देणं यामुळे तुम्ही तुमच्या सर्वोत्तम आणि सर्वाधिक आनंदी ‘स्व’कडे कसे जाता हे शोधणं तुम्हाला या पुस्तकामुळे शक्य होईल. यामध्ये जीवनाचे सर्जनशील ते आध्यात्मिक असे सर्व आयाम समाविष्ट आहेत. हीच संकल्पना रोजच्या जीवनासंदर्भात मांडण्यात आली असून, तिचा शोध कुठे घ्यायचा, तिच्याकडे पाहायचं कसं, तिला आपलंसं कसं करायचं, दैनंदिन जीवनात तिचं उपयोजन कसं करायचं हे या पुस्तकातून समोर येतं. डोळ्यांनी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष कृती करायची असते म्हणूनच काही सोपे आणि सुलभ कृती आराखडे देण्यात आले आहेत. आपल्या मनात आणि घरात अधिक जागा मोकळी करण्यासाठी, नको असलेल्या मानसिक आणि भौतिक बाबी दूर करण्यासाठी उपाय सुचवत, हे आराखडे आपल्याला प्रेरित करत अधिक सर्जनशील बनवतात.

About the Author(s)

नोबुओ सुझुकी यांनी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्या नवनवीन आयामांचा आणि विचारांचा अभ्यास करण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. आशिया खंडात सर्वत्र प्रवास करत असताना त्यांनी झेन पद्धतीची सांगड आर्ट थेरपींशी (कला उपचार) घालण्याची पद्धत विकसित केली. जीवन समस्यांचा विचार करताना पर्यायी मार्ग शोधू पाहणार्‍या क्लाएन्ट्सबरोबर ते आता काम करतात. पियानो वाजवणं, आपल्या प्रवासाच्या आठवणींची नोंद करणं आणि आपले विचार ध्वनिमुद्रित करणं या बाबी त्यांना अतिशय प्रिय आहेत. ‘वाबी-साबी - द विस्डम इन इम्पर्फेक्शन’ हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18423264
Code ProfilerTimeCntEmallocRealMem