Zen and the Art of Happiness	(Marathi)

Zen and the Art of Happiness (Marathi)

Author : Chris Prentiss (Author) Amar Devgavkar (Translator)

In stock
Rs. 225.00
Classification Self-help/ Spirituality
Pub Date July 2022
Imprint Marathi
Page Extent 138
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924950
In stock
Rs. 225.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

अत्याधुनिक विज्ञान आणि अध्यात्म आपल्याला सांगतं की, आपण ज्यावर विश्वास ठेवतो, जो विचार करतो आणि जे आपल्याला वाटतं, तेच पेशीय पातळीवर आपल्या शरीराची रचना ठरवतात. झेन आणि आनंदी राहण्याची कला या पुस्तकात तुम्ही कसा विचार करायचा हे शिकाल, जेणेकरून तुम्ही जसा विचार कराल आणि जे तुम्हाला वाटेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात नैराश्य व दु:खाची नाही, तर आनंद आणि ऊर्जेची निर्मिती होईल.
आयुष्यातील अटळ बदलांशी जुळवून कसं घ्यावं, निरोगी मार्गानं तणाव कसा हाताळावा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात सचेतन आनंद कसा जोपासावा हे तुम्ही यातून शिकाल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, झेन आणि आनंदी राहण्याची कला या पुस्तकातील समाविष्ट ज्ञान तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्कृष्ट अनुभवांना आमंत्रित कसं करावं आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आधार देईल, असं एक वैयक्तिक तत्त्वज्ञान कसं निर्माण करावं, हे शिकवेल.

About the Author(s)

क्रिस प्रेन्टिस हे मालिबू, कॅलिफोर्निया येथील ‘अ‍ॅडिक्शन क्युअर सेंटर पॅसेजेस’चे सहसंस्थापक आणि सहसंचालक असून ते द अल्कोहॉलिझम अ‍ॅन्ड अ‍ॅडिक्शन क्युअर ः अ होलिस्टिक अ‍ॅप्रोच टु टोटल रिकव्हरी या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी चिनी तत्त्वज्ञान आणि व्यक्तिगत विकासासंबंधी डझनभर पुस्तकं लिहिली आहेत. आय चिंग या ग्रंथाच्या त्यांनी लावलेल्या अर्थांसाठीदेखील ते जगविख्यात आहेत, ज्यामुळे हा प्राचीन, गूढ आणि समजायला अवघड विषय; उपयोगात आणण्यास आणि लागू करण्यास सोपा होतो. प्रेन्टिस यांनी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये व्यक्तित्व विकासाच्या अनेक कार्यशाळा घेतलेल्या असून त्यांनी एका फीचर फिल्मचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील केलेली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18457656
Code ProfilerTimeCntEmallocRealMem