The Magic ( MarathI)

The Magic ( MarathI)

Author : Rhonda Byrne (Author) Rohini Pethe (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Mind, Body & Spirit
Pub Date 2013
Imprint Manjul Publishing House
Page Extent 279 pp
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9788183223492
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

गेल्या सुमारे वीस दशकांहून अधिक काळ एका पवित्र धर्मग्रंथामधील वचनाचे ज्यांनी वाचन केले, त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांनी त्याच्याभोवती एक गूढतेचे वलय निर्माण केले. त्यांच्या अर्थाबाबतही गोंधळ आणि गैरसमज निर्माण झाला. इतिहासातल्या काही थोड्या लोकांना मात्र याची जाणीव झाली. त्यांना कळले की, त्यातले शब्द हे एक कोडे आहे आणि एकदा का ते तुम्हाला सोडवता आले, त्याचे गूढ उकलता आले की एक नवे जग तुम्हाला दिसू लागते. असे हे जीवनच बदलून टाकणारे ज्ञानाचे जग रॉन्डा बर्न त्यांच्या या पुस्तकातून आपल्यासाठी खुले करतात. मग सुरू होतो 28 दिवसांचा एक अविश्वसनीय, आश्चर्यचकित करून टाकणारा प्रवास. या प्रवासात तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी या ज्ञानाचा कसा वापर करायचा हे त्या तुम्हाला शिकवतात. तुम्ही कोणीही असाल, कोठेही असाल, सध्या कोणत्याही परिस्थितीत असाल तरी ही हे पुस्तक तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे!

About the Author(s)

रॉन्डा बर्न या द सीक्रेट या डॉक्युमेंटरी फिल्मच्या निर्मात्या आहेत. ही फिल्म सन 2006मध्ये जगभर झपाट्यानं लोकप्रिय झाली. या फिल्मने लाखो लोकांची आयुष्यं बदलून टाकली आणि जागतिक स्तरावर एक चळवळ प्रज्ज्वलित केली. त्याच वर्षी रॉन्डा बर्न यांचं द सीक्रेट हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं सुमारे पन्नासहून अधिक भाषांमध्ये भाषांतर झालं आणि ते या शतकातील दीर्घ काळापर्यंत बेस्टसेलर असलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक ठरलं. त्यांच्या इतर बेस्टसेलर पुस्तकांमध्ये द पॉवर (2010) आणि हिरो (2013) या पुस्तकांचा समावेश आहे. रॉन्डा बर्न यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून सध्या त्यांचं वास्तव्य कॅलिफोर्नियात आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18456312
Code ProfilerTimeCntEmallocRealMem