Imran Khan (Marathi)

Imran Khan (Marathi)

Author : Atul Kahate

In stock
Rs. 225
Classification Non-Fiction/ Biography
Pub Date 10 November 2018
Imprint Manjul
Page Extent 146 pages + 4 Photo colored photo page
Binding Perfect Paperback
Language Marathi
ISBN 978-93-88241-15-1
In stock
Rs. 225
(inclusive all taxes)
OR
about book

इम्रान खान
प्लेबॉय क्रिकेटपटू ते पंतप्रधान!

इम्रान खान हा क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या अष्टपैलू कामगिरीनं पाकिस्तानला अनेक आंतरराष्ट्रीय सामने जिंकून दिले. कर्णधार म्हणून तर इम्रान कदाचित आजवरचा सगळ्यात प्रभावशाली नेता ठरावा. त्याच्याच नेतृत्वाखाली पाकिस्ताननं अत्यंत अनपेक्षितरीत्या विश्वचषक जिंकला.
हाच इम्रान आता राजकारणात 22 वर्षं झुंज देऊन पाकिस्तानचा पंतप्रधान झाला आहे. सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलेलं असताना नेहमीच्याच जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं इम्रान राजकारणातही आपली खेळी खेळण्याच्या बेतात आहे. अत्यंत वादळी, विवादास्पद आणि नाट्यमय आयुष्य जगलेल्या इम्रानच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कारकिर्दीचा हा ओघवता शब्दबद्ध आलेख आहे.

About author

अतुल कहाते हे एमबीए पदवीधर असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 17हून जास्त वर्षांचा तसंच संगणकशास्त्राच्या विषयांमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांना अनुभव आहे. संगणकाविषयी त्यांनी 20 इंग्रजी पाठ्यपुस्तकं लिहिली असून, मराठीमध्ये त्यांची अनेक पुस्तकं आणि लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक टीव्ही चॅनेल्सवर त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. लिखाणासाठी त्यांना वेगवेगळ्या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.